शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

मालेगाव स्फोट; आठ आरोपमुक्त

By admin | Published: April 26, 2016 6:30 AM

मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले.

मुंबई : मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले. विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) व सीबीआयला मोठा दणका बसला आहे. या स्फोटात ३७ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. मालेगावात २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील नऊ आरोपींनी स्वामी असीमानंद यांनी राष्ट्रीय तपास पथकाकडे दिलेल्या कबुलीजबाबानंतर विशेष मोक्का न्यायालयात आरोप मुक्ततेसाठी अर्ज केला. स्वामी असीमानंद यांच्या कबुलीजबाबानुसार, मालेगाव २००६ चा बॉम्बस्फोट कट्टर उजव्या विचारसरणीची संघटना ‘अभिनव भारत’ने घडवून आणला. एनआयएनेही मालेगाव २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटासाठी ‘अभिनव भारत’ला जबाबदार धरले आहे.पाच वर्षांच्या कारावासानंतर या सर्व आरोपींनी आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला. तसेच २०११ मध्ये जामिनासाठी अर्जही केला. त्यांच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. सोमावरी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी या सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. नऊपैकी सहा आरोपी कायमचे कारागृहाबाहेर आले. तर दोन आरोपींना मुंबईच्या लोकल बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर एकाचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे.नुरुल हुडा समसुदोहा, रईस अहमद रज्जब अली, सलमान फर्सी, फारोघ इक्बाल मगदुमी, शेख मोहम्मद अली अलाम शेख, असीफ खान बशीर खान, अब्रार अहमद गुलाम अहमद, मोहम्मद झहीद अब्दुल माजीद अशी या आठ जणांची नावे असून, शब्बीर अहमद मशीउल्ला याचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे. हे सर्व बंदी घातलेल्या सिमीचे सदस्य आहेत आणि त्यांनी बॉम्बस्फोटासाठी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर - ए - तोयबाची मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. - आणखी वृत्त/१२>प्रकरण काय ? ८ सप्टेंबर २००६ रोजी या नऊ जणांनी कट रचत नाशिकमधील मालेगावसारख्या संवेदनशील भागात तीन बॉम्बस्फोट केले. गर्दी असलेला बाजार, दफनभूमी आणि शब्बे- बरातच्यावेळी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट केला. या बॉम्बस्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला, तर १०० लोक जखमी झाली. हे होते आरोप : आयपीसी कलम ३२४, ३२५, ३२६, १२१ (ए) आणि १२० (बी) तर आरोपींवर एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याशिवाय मोक्का व बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवला होता.