ऑनलाइन लोकमत
पुणे (घोडेगाव), दि. 2 - शासन आणि प्रशासन यांनी एकत्रीत काम केल्यास माळीणसारखे सुंदर पुनर्वसन होते. या दोन्ही यंत्रणा संवेदनशील असतील तर काय होऊ शकते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे माळीण असल्याचे सांगत राज्यात यापुढे पुनर्वसनासाठी माळीणचे रोल मॉेडेल वापरणाार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
डोंगराचा कडा कोसळल्यामुळे गाडले गेलेले माळीण गाव पुन्हा एकदा नव्या दमाने उभे राहत आहे. माळीणशेजारीच आमडे गावात हे पुनर्वसन करण्यात आले आहे. एखादी आपत्ती घडल्यानंतर त्याठिकाणाहून विस्थापित होणा-या लोकांचे पुनर्वसन किती चांगल्या प्रकारे होऊ शकते याचे रोल मॉडेल म्हणून नव्याने उभ्या राहिलेल्या माळीण या गावाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करून त्याचे लोकार्पण करण्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दोन ग्रामस्थांना घराच्या चाव्या व संसारोउपयोगी वस्तू दिल्या.
या कार्यक्रमाला महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय आणि विशेष साह्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, जिल्हाधिकारी सौरव राव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले , जिल्हाधिकारी व शासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलतेने हे काम लवकर पूर्ण केले. हे आदर्श पुनर्वसन होण्याकरीता सरकारी यंत्रणा पुरी पडली नसती. समाजातील लोकांनी वाटा उचलल्याने हे पुनर्वसन आपण करू शकलो. मुख्यमंत्र्यांनी सुरूवातीला कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर तेथील एक घराची पाहणी केली.
पाणी प्रश्न सोडविणार
माळीनचे पुनर्वसन झाले आहे. मात्र येथील ग्रामस्थांना पाणी टंचाई जानवू नये म्हणून आसाने येथील तलावातून पाणीयोजना करनार असून यासाठी १४ कोटी ७७ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यादिली असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.