शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

माळीणकरांना तात्पुरता निवारा मिळाला

By admin | Published: October 06, 2014 4:35 AM

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना रविवारी तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवारा शेडचे वाटप करण्यात आले

घोडेगाव (जि. पुणे) : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना रविवारी तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवारा शेडचे वाटप करण्यात आले. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त केली.माळीण गावावर ३० जुलैला डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याच्या निवारा शेड बांधण्यात आल्या आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना प्रत्यक्षात सध्या २५ निवारा शेड उभ्या करण्यात आल्या. आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले तसेच खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम घरे देण्यात आली. तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना नंतर निवारा शेड देण्यात येणार आहे. मात्र निवारा शेड न मिळालेल्यांनी दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.तातडीची गरज असलेल्या लोकांना आधी घरे दिली आहेत. ७२ पक्की घरे बांधायची असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. त्यात रस्ते, वीज-पाण्यापासून सर्व नागरी सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)