लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टॅब, व्हर्चुअल कलासरूम अशा सुविधा देऊन मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांना हायटेक केले. मात्र त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये महापालिका शाळांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ३४ टक्के म्हणजे चौपटहून अधिक वाढले आहे. मलबार हिल, गोवंडी, सांताक्रूझ, चेंबूर, कुलाबा, ग्रॅण्ट रोड, अंधेरी येथील शाळांमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सकस आहारावर खर्च होणारे करोडो रुपये ही केवळ धूळफेक असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रजा फाउंडेशन या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून पालिका शाळांचे हे वास्तव समोर आले. सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांमध्ये पालिका शाळेतील कुपोषित मुलांची आकडेवारी या संस्थेने मिळवली. यामध्ये २०१३ मध्ये पालिका शाळांमध्ये अंदाजे ३० हजार ४६१ मुले कुपोषित होती. हेच प्रमाण २०१५-१६ मध्ये तब्बल एक लाख ३० हजार ६८० वर पोहोचले आहे. म्हणजेच पालिका शाळेतील ३४ टक्के मुले कुपोषित आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे. एम वॉर्ड गोवंडी व मानखुर्दमध्ये मुंबईतील सर्वांत कमी मानवी निर्देशांक आढळून आला आहे. २०१५-१६ मध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वांत जास्त १५ हजार ३८ एवढे आहे. हा निधी जातो कुठे?२०१३-१४ मध्ये पालिकेच्या अर्थसंकल्पात अंदाजे पहिली ते पाचवी २९ कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला होतो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात या निधीमध्ये वाढ होऊन ३२ कोटी करण्यात आली. मात्र या निधीचा वापर ८१ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर आला आहे. २०१३-२०१४एकूण मुलगे २०१९६५-मुली -२०२२८६तपासणी केलेली मुले- ७६१७५, मुली- ८०८३६कुपोषणाचे प्रमाण मुले - ४९३८, मुली- ६८९३२०१४-२०१५एकूण मुलगे - १९९०३३, मुली - १९८०५२तपासणी केलेली मुले - ९७८२५, मुली- १०३७७२कुपोषणाचे प्रमाण मुले - २६१७०, मुली- २७३३८२०१५-२०१६एकूण मुलगे - १९२६५२, मुली १९०८३३तपासणी केलेली मुले - ९२२५८, मुली- ९७५५१कुपोषणाचे प्रमाण मुले - ३०४५९, मुली- ३४२२२पहिल्या पायरीपासूनच कुपोषण शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या पहिलीतच विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. २०१५-१६ मधील आकडेवारी अनुसार पहिलीच्या वर्गातील मुलींमध्ये ४३ टक्के व मुलांमध्ये ४२ टक्के कुपोषित आहेत. सांताक्रूझ व कुर्ला येथे कुपोषित मुलांचे प्रमाण अनुक्रमे ९१०० व ६५८६ एवढे आहे. सहावी ते आठवी २०१३-१४ अंदाजे ३३ कोटींची तरतूद होती. यामध्ये २०१५-१६ मध्ये वाढ होऊन ३९ कोटी तरतूद करण्यात आली. या निधीचा वापर ८३ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर आला आहे. नगरसेवक व प्रशासन उदासीन पालिका शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करणारे नगरसेवक विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी मात्र उदासीन असल्याचे समोर आले आहे. कुपोषितांचे प्रमाण पालिका शाळांमध्ये वाढत असताना नगरसेवकांनी मात्र या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित केवळ मोजकेच प्रश्न विचारले आहेत. कुपोषणावर नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न २०१३ मध्ये १५ नगरसेवकांनी १७ प्रश्न विचारले२०१४ मध्ये १३ नगरसेवकांनी १५ प्रश्न विचारले२०१५ मध्ये १३ नगरसेवकांनी १६ प्रश्न विचारले
कुपोषित मुलांचे प्रमाण चौपट
By admin | Published: May 31, 2017 6:50 AM