नागपूर: जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यात 22क् बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत. आतार्पयत विरोधी बाकावर बसलेले असताना हे मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा दावा करणा:यांनी सत्तेत येताच विविध वैद्यकीय कारणास्तव हे मृत्यू झाल्याचा पवित्र घेतला आहे.
विधान परिषदेत ठाणो जिल्ह्यातील बालमृत्यूंबाबत धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, जून ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 11 माता व 22क् नवजात बालकांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 7 मातामृत्यू व 234 नवजात बालकांचे मृत्यू झाले होते. मातामृत्यूमधील वाढ वैद्यकीय कारणास्तव झालेली आहे. गरोदर मातांची नोंदणी करून त्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणो व लोहयुक्त गोळ्य़ा देणो, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात प्रसुतीपूर्व, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात देण्यात येणा:या वैद्यकीय सुविधांची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात जुलै ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 18क् बालकांचे मृत्यू झालेले आहेत, अशी कबुली सुनील तटकरे, हेमंत टकले आदींनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. त्यामध्ये कमी वजनामुळे 18, तापसदृश्य आजारामुळे 1क्, डायरियामुळे 5, न्युमोनियामुळे 28, कमी दिवसाच्या प्रसुतीमुळे 11, अॅसपेक्शियामुळे 23, सेप्टीसिमियामुळे 19, इतर आजारांमुळे 42 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार असताना ठाणो, मेळघाट येथील बालमृत्यू विविध आजारांमुळे होत असल्याचे शिवसेना मान्य करीत नव्हती. कुपोषण हीच मूळ समस्या असल्याचा दावा करीत होती. आता आरोग्य खाते शिवसेनेकडे आल्यावर मात्र कुठेही हे बालमृत्यू कुपोषणाने झाल्याचे मान्य केलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)