- राजेश भांगे
शिरोशी, दि. १४ - माळशेज घाटात आठवडा भरात तब्बल १३ ठिकाणी दरडी कोसळल्या असुन दरडी कोसळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.वाहतुकीसाठी महामार्ग खुला होण्याची शक्यता नसुन जर झाल्यास एकेरी वाहतूक करावी लागेल. मात्र धोकादायक रस्त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटिल व टोकावडे पोलिस पंकज गिरी व उप.नि.विजय धुमाळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत आहेत.वर्षभर केलेल्या ब्लास्टिंगच्या सिफोटाने डोंगर भुसभुशीत होऊन कोसळू लागला आहे.अठवडाभरापुर्वी रविवारी सावर्णे गावाजवळ ट्रकवर दरड कोसळली होती.तेव्हापासुन सुरू झालेले सत्र थांबलेले नाही.सात दिवसात १३ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.या दुर्घटनेत बेपत्ता झालेला ट्रकचा चालक सैय्यद शेर अली याचा अद्याप शोध लागला नाही.तसेच तो जिवंत असण्याची शक्यता कमी आहे.कल्याण नगर महामार्गावरील वाहतुक ठप्पच आहे.या बाबत राष्ट्रीय आधिकार्याचे संपर्क होत नाहीत.व त्यांचे भ्रमणध्वनि बंदच आहेत.सुरक्षितेच्या दृष्टीने महामार्ग विभाग सपशेल फोल ठरला आहे.टोकावडे पोलिस व तहसीलदार विभाग या घाटात कार्यरत असल्याने त्याच्या प्रयत्नाने एकेरी वाहतुक सुरू होण्याची शक्यता असुन अद्याप काही दिवस वाटपहावी लागेल.रविवार म्हणजे हजारो पर्यटकांची जमा या घाटात भरते मात्र दरडी कोसळण्याच्या भिती पोटी त्यांनी इकडे पाठफिरविल्याने रस्त्यावर चहा ,वडापाव, भुट्टा, शेंगा,रानमेवा,विकुन पोट भरणार्या २०० ते २५० छोट्या-छोट्या व्यवसायांवर संकट कोसळले आहे .या पावसाळ्यात त्यांचा रोजगार बुडल्याचे चित्र दिसून येते.