ऑनलाइन लोकमत
आकोट(जि.अकोला), दि. ७ - मामाने आपल्या सख्या अल्पवयीन भाचीला मारहाण करून जंगलात बलात्कार केल्याची घटना आकोट तालुक्यातील पोपटखेड- अकोलखेड परिसरात रात्री घडली. या प्रकरणी 7 सप्टेबर रोजीमामाला पोलीसांनी गजाआड केले आहे.
मामा-भाची या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अकोला येथील राजु नामक इसम 6 सप्टेंबर रोजी अंजनगाव तालुक्यातील पांढरी येथे गेला. तेथे नववीत शिकणा-या भाचीला आईची तब्येत बरी नसल्याचे सांगत तो तिला शाळेतून घेऊन गेला. त्यानंतर तो तिला आडमार्गाने पोपटखेड- अकोलखेड या परीसात घेऊन गेला व तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने
कशीबशी सुटका करून एकटीने रात्र घनदाट जंगलात काढली व उजाडताच पळ काढला. या घटनेची माहीती मिळताच आकोट ग्रामीण पोलीसांनी भाचीला शोधून काढले. तिला उपचारांकरिता रुग्णालयात पाठवले तर मामाला अटक केली अशी माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला भांदवी 376,511, 3,4,18 पास्को गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरिक्षक बाळासाहेब नाईक तपास करीत आहेत.