मुंबई : आॅनलाइन शॉपिंगच्या वाढत्या जाळ्यात ग्राहकांची फसवणूक करत त्यांना मागविलेल्या वस्तूंऐवजी दगड, जुन्या चप्पल पाठविणाऱ्याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. लेदरु मोहम्मद खान (३०) असे आरोपीचे नाव असून तो तपासात एका कंपनीच्या कॉलसेंटरमधील नोकर असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे कक्ष २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कदम, सचिन माने, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार गुंडेवाड यांनी तपास करून ऐरोली येथून खानला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन शॉपिंगमध्ये दगड पाठविणाऱ्याला अटक
By admin | Published: May 05, 2017 4:33 AM