विलास जळकोटकरसोलापूर दि ९ : विजेवर वेगात सुरू असलेला कटर त्याच्या मानेवरून सऽऽरऽऽ करून गेला अन् रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. कापलेली अर्धी मान दोन तासात जोडून एका कर्त्या तरुणाला मृत्युच्या जबड्यातून परत आण्याची किमया मार्कडेय रूग्णालयातील हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे आणि त्यांच्या पथकाने केली. रमेश वायचळ असे या तरुणाचे नाव.बाळे येथे राहणारा रमेश वायचळ शनिवारी फॅब्रिकेटर्स कारखान्यात काम करीत होता. सायंकाळच्या सुमारास अचानक गोल चकत्याच्या आकाराचा कटर विजेच्या प्रवाहाने वेगात सुरू असताना रमेशच्या उजव्या मानेला लागला आणि जवळपास चार इंच मानेचा भाग चिरत गेला. जिवाच्या आकांताने त्याचा आरडाओरडा पाहून कारखान्यातील व्यवस्थापकासह सर्वांनी तातडीने त्याला डॉ. होगाडे यांच्याकडे नेले. त्याची चिंताजनक स्थिती पाहून माकंर्डेय सहकारी रुग्णालयात डॉ. विजय अंधारे यांच्याकडे जाण्यास सुचवले. रुग्णाच्या मानेला कापड दाबून रुग्णवाहिका माकंर्डेय रुग्णालयात दाखल. आपत्कालीन विभागात डॉ. आशुतोषकुमार सोहनी हजर होते. त्यांनी तत्परतेने शस्त्रक्रियागृहात दाखल करण्याची प्रक्रिया राबवली. डॉ. आशुतोष यांनी रुग्णालयाच्या व्हॉट्सअ?ॅप ग्रुपवर व्हिडीओ पाठवला आणि १५ मिनिटात मुख्य इन्चार्ज ममता मुनगा-पाटील आणि घरी गेलेले कर्मचारी मिळेल त्या वाहनाने हजर झाले. सर्वांनी मिळून प्रयत्न सुरू केले. एव्हाना रात्रीचे ९.३० वाजले. रक्तस्राव मोठा होत असल्याने डॉ. आशुतोष त्याच्या मानेवर जोराचा दाब धरून होते. डॉ. विजय अंधारे यांनी सर्वप्रथम पाहणी केली. दहा सें. मी. लांब, ६ सें. मी. रुंद आणि ४ सें. मी. खोल जखम होती. रक्तप्रवाहामुळे आत कुठली रक्तवाहिनी तुटली याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे मान सरळ करता येणेही अशक्य होते. त्यातच रक्तदाब ७८/८० दिसत होता. हृदयाचे ठोके खाली ४० पर्यंत यायचे मध्येच १३०/१४० यायचे. यामुळे चिंताजनक स्थिती होती. रक्तदान आणि नाडी बंद होऊ नये यासाठी तीन-चार सलाईन लावून दिले. जखम काय आहे हे पाहण्यासाठी रक्त शोषून घेण्यासाठी सक्शन मशीन टाकली. त्यामुळे मान हलवावी की, नाही हे लक्षात येणार होते, अन्यथा रक्तवाहिनी तुटेल याची भीती होती. अखेर निदान झाले. मेंदूकडून हृदयाकडे घेऊन जाणारी रक्तवाहिनी जवळपास ७ सें.मी. उभी कट झाली होती. १ ते २ मि. मी. पापुद्रा काय तो चिकटून होता. दुसºया शुद्ध रक्तपुरवठा करणाºया हृदयाकडून मेंदूकडे जाणाºया रक्तवाहिन्यांच्या फांद्या तुटून गेल्या होत्या. त्यातून फार रक्तस्राव सुरू होता. काय झाले याची कल्पना आली आणि डॉ. अंधारेंनी ह्यडोंट वरीह्ण म्हणत झटपट शस्त्रक्रिया सुरू केली. रक्तवाहिनी कंट्रोल करण्यासाठी क्लॅप सरकवून रक्तस्राव थांबवला. मेंदूकडून हृदयाकडे जाणारी जी रक्तवाहिनी फाटली होती तिला सूक्ष्म टाके टाकून दुरुस्त केली. रात्री ९.३० वाजता सुरू झालेली क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया ११.३० वाजता पूर्ण झाली अन् सर्वांच्या चेहºयावर हासू विलसले. उमद्या घरच्या कर्त्यासवरत्या तरुणाला वाचवल्याचे समाधान आम्हा सर्वांच्या चेहºयावर दिसल्याचे वर्णन डॉ. विजय अंधारे यांनी चलचित्राप्रमाणे लोकमतशी बोलताना सांगितले. डॉ. अंधारे यांनी यापूवीर्ही चेंदामेंदा झालेल्या रुग्णांच्या रक्तवाहिन्या जोडून रुग्णाला जीवदान दिले आहे.-----------------यांचे लाभले योगदान- दोन-अडीच तास मृत्यूशी झुंज देणाºया रमेशचे प्राण वाचवण्यासाठी माकंर्डेय सहकारी रुग्णालयातील डॉ. विजय अंधारे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ डफळे, समन्वयक भाग्यश्री मणुरे, डॉ. आशुतोषकुमार सोहनी, मुख्य इन्चार्ज ममता मुनगा-पाटील, केशव मेरगू, बाळकृष्ण कोटा, सुभाष बोद्धूल यांच्यासह अनेकांनी वेळीच योगदान दिल्याने अत्यंत क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.-----------------------काळ आला होता पण वेळ नव्हती!- एखाद्या रुग्णावर जीवघेणी आपत्ती ओढावणे आणि त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करणे, तितक्याच तत्परतेने आणीबाणीच्या स्थितीतही सर्व स्टाफ वेळेवर पोहोचणे या साºया प्रक्रिया जुळून आल्या. माकंर्डेय सहकारी रुग्णालयातील प्रशासनानेही प्रसंगावधान राखत दाखवलेले भान यामुळे मरणाच्या दाढेतून रमेशला जीवदान मिळाले. आम्हाला यश आले. शेवटी ह्यकाळ आला होता पण वेळ नव्हतीह्ण अशी स्थिती यावेळी अनुभवयास मिळाल्याच्या भावना माकंर्डेय सहकारी रुग्णालयाचे हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
कापली गेलेली मान दोन तासात जोडून तरुणाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:29 PM
विजेवर वेगात सुरू असलेला कटर त्याच्या मानेवरून सऽऽरऽऽ करून गेला अन् रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. कापलेली अर्धी मान दोन तासात जोडून एका कर्त्या तरुणाला मृत्युच्या जबड्यातून परत आण्याची किमया मार्कडेय रूग्णालयातील हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे आणि त्यांच्या पथकाने केली. रमेश वायचळ असे या तरुणाचे नाव.
ठळक मुद्देअवघड शस्त्रक्रिया करुन तरुणाची मृत्युच्या जबड्यातून सुटका