राजा माने-सोलापूरकाव्य असो वा आयुर्वेद, नाट्य असो वा नाच प्रत्येक क्षेत्रात जिंदादिल राहून तो धडपडत होता. समाज आणि कुटुंबासंदर्भातील स्वप्नात रममाण होत होता आणि अचानक एका क्षणी दैवाने घात केला. अपघात झाला अन् खांद्याच्या खालील शरीर संवेदना हरवून बसला ! चक्काचूर झालेल्या स्वप्नांच्या गाठोड्याकडे बघत रडत न बसता त्याने चक्क दैवाशीच बंड पुकारले. आपले तोंडच आपल्या बुद्धीचे हत्यार बनविले आणि लाखो विद्यार्थ्यांना मदतीचे ठरणारे संगणकीय जगतात निर्मिले स्वत:चे जिंदादिल ‘ज्ञानराज’... पंचविशीतील त्या तरुणाचे नाव आहे डॉ. ज्ञानराज राजकुमार होमकर !पुणे येथे बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात ज्ञानराज शिक्षण घेत होता. १ फेब्रुवारी २०१३ रोजी स्नेहसंमेलनाच्या रोप डान्स प्रकारात आपली कला सादर करताना अचानक तो दोरीवरून निसटला अन् हनुवटीवर तब्बल आठ-दहा फूट उंचावरून आपटला. त्यामुळे त्याची मान निखळली. दोन मणके निकामी झाले. नसांचे नियंत्रण सुटले व खांद्याखालच्या नसा निकामी होऊन खालचे शरीर संवेदनाहीन झाले. वडील राजकुमार, आई शैलजा, मोठा भाऊ शैराज आणि बहीण राहीसह त्याच्या मित्रपरिवाराने त्याच्यावर चांगल्या उपचारासाठी कंबर कसली, परंतु ज्ञानराजला होणाऱ्या जीवघेण्या वेदनांच्या पलीकडे हाती काहीच लागले नाही. वैद्यकीय शास्त्रांनुसार त्याला ‘क्वाड्रिप्लेजीया’ (पॅरेलिसीसचा एक प्रकार- मानेखालील संपूर्ण शरीर निकामी) विकार झाल्याचे स्पष्ट झाले. ज्ञानराजच्या पुढे अंधाराशिवाय काहीच उरले नाही. त्याला सोलापुरात बाळीवेशीतील त्याच्या घरी आणण्यात आले. या सर्व परिस्थितीत त्याच्या कुटुंबाने खचून न जाता त्याला सतत आशावादी बनविले. बुद्धी आणि तोंडाशिवाय शरीराचा कुठलाही अवयव साथ देत नसताना त्याने जगासाठी काहीतरी करायचा निश्चय केला. तोंडात काडी पकडून त्याद्वारे त्याने हळूहळू संगणक हाताळायला सुरुवात केली. पाहतापाहता हाताळणीत तो तरबेज झाला. च्बारावीनंतर आणि इतर प्रवेश परीक्षा (सीईटी) यावर त्याने अभ्यास आणि संशोधन सुरू केले. त्यातूनच आता त्याने त्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणारी वेबसाईट तयार केली. तो ती वेबसाईट विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करणार आहे. च्परीक्षा तंत्रातील अनेक बारकाव्यांचा अभ्यास करून त्याने साडेतीन हजार प्रश्नांची मालिका या वेबसाईटसाठी तयार केली आहे. येत्या काळात सहा हजार प्रश्नांचे संकलन करण्याचा त्याचा मानस आहे. च्दैवाच्या विरोधात बंड उभे करून ‘ज्ञानराज’ निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ज्ञानराजने आपले संशोधन सुरू ठेवले आहे.च्त्याच्या शरीरातील अवयवांना संवेदना कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आजतरी वैद्यक शास्त्राजवळ नाही. लंडनमध्ये या विकारावर संशोधन सुरू आहे.
तोंडानेच निर्मिले जिंदादिल ‘ज्ञानराज’!
By admin | Published: January 11, 2015 1:52 AM