शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
3
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
4
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
5
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
6
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
7
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
8
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
9
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
10
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
11
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
12
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
13
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
14
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
15
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
16
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
18
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
19
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
20
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय

आगारांमधील कारभार हा रामभरोसे

By admin | Published: July 18, 2016 3:20 AM

कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे

ठाणे- कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे. कार्यशाळा व्यवस्थापकाचे पद परिवहन सुरू झाल्यापासून भरलेच गेलेले नाही. तीच परिस्थिती उपव्यवस्थापकाची. सहायक कार्यशाळा अधिकारी-०२, सहायक कार्यशाळा अधीक्षकाची महासभेने १२ पदे मंजूर केली होती. परंतु, सरकारमान्य पदे ८ असून तीन पदे आजही रिक्त आहेत. प्रमुख मेकॅनिकची महासभेची १२ पदे मंजूर असून सरकारमान्य ९ पदे असून त्यातील ५ पदे रिक्त आहेत. वाहन तपासणीसच्या बाबतीतही १२ महासभेची, सरकारमान्य केवळ ३ असून त्यातील केवळ १ पद भरण्यात आले असून दोन पदे रिक्त आहेत. मेकॅनिक दर्जा-१ ची ६, आॅटो इलेक्ट्रिशिन १, असिस्टंट आॅटो इलेक्ट्रिशियन १, मदतनीस २५, अशी एकूण महासभेने मंजूर केलेल्या ३७० पदांपैकी २७५ पदे भरली असून केवळ कार्यशाळेतील ४६ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे एकूणच परिवहनमध्ये अ आणि ब विभागात मोडणारी अन्य ४०० पदे रिक्त असून अ विभागातील परिवहन व्यवस्थापक वगळता, उपव्यवस्थापक, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, मराठी लघुटंकलेखक, कनिष्ठ टंकलेखक, द्वारपाल, सुरक्षारक्षकांची १४ पदे अशी एकूण अ विभागात मोडणारी १४५ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. तर, ब विभागात म्हणजेच वाहतूक विभागात आगार व्यवस्थापक १, वाहतूक निरीक्षक ३, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वाहतूक नियंत्रक ३, चालक १८२ आणि वाहक १५५ अशा एकूण २१७७ पदांपैकी ३५७ पदे रिक्त आहेत.>कार्यशाळेला गळतीकार्यशाळेतील गिअर, युनिट, टायर विभागांसह इतर विभागांना सध्या गळती लागली आहे. कार्यशाळेच्या गिअर बॉक्स विभागाला जे प्लास्टिकचे छत टाकले आहे. त्याचे बाम्बू कमकुवत झाले आहेत. थोडा पाऊस झाला तरी पाणी तेथील साहित्यावर पडत असून या साहित्यालाही गंज पकडू लागला आहे. तसेच थ्री-फेजची लाइन येथून गेली असल्याने येथे शॉर्टसर्किटची शक्यताही नाकारता येत नाही. तरीसुद्धा आपला जीव मुठीत धरून हे कर्मचारी काम करीत आहेत. तसेच येथे महावितरणचा डीपी असून त्यावरील छपरालादेखील गळती लागली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही पडझड झाली असून येथील अनेक ठिकाणचे स्लॅब पडण्याच्या स्थितीत आहेत. कार्यशाळेबरोबर इतर कर्मचाऱ्यांना बढती नाहीकार्यशाळा आणि इतर विभागांत २२ वर्षांपासून कर्मचारी कार्यरत असून त्यांना अद्याप बढती दिलेली नाही. कार्यशाळेत १५० च्या आसपास कर्मचारी असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे येथे आजही ४५ कर्मचाऱ्यांची वानवा आहे. चालक, वाहकांची संख्या कमीपरिवहनचा गाडा रुळांवर आणण्यासाठी चालक आणि वाहकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु, परिवहनची सध्याची परिस्थिती पाहता सध्या उपलब्ध असलेल्या चालक आणि वाहकांना पहाटेच्या वेळेस बससाठी १ ते २ तास वाट पाहावी लागते. चालक, वाहकांच्या भरतीसाठी १० वर्षांपूर्वी प्रयत्न झाला होता. परंतु, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने परिवहनने पुन्हा नव्याने भरतीसाठी पावलेच उचलली नाही. -परिवहन सेवचा बट्ट्याबोळ हा प्रशासनानेच केला असून तेच परिवहन सेवा डबघाईत घालण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे परिवहन नाही तर आता प्रशासनदेखील भंगारात टाकण्याची वेळ आली आहे.- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य >जीव धोक्यात घालून कर्तव्यपालनटीएमटीच्या आगारांतील दृश्य पाहिल्यास येथे माणसे काम करतात, याचा प्रशासनाला विसर पडला आहे. दुर्गंधी, डास, अस्वच्छता यांचा त्रास सहन करत कर्मचारी काम करत आहेत. इमारतीची झालेली दुरवस्था, ठिबक सिंचन यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत.