- डिप्पी वांकाणी, मुंबईस्त्रियांच्या अंतर्वस्त्रे उत्पादक कंपनीच्या गोदाम व्यवस्थापकाने, बँकेत कंपनीच्या नावाने बनावट खाती उघडून ८३ लाख रुपयांची फसवणूक केली. खाते उघडताना त्याने आॅटोरिक्षा चालकाला कंपनीचा मालक दाखविले. ग्राहकाकडून धनादेश घेणे आणि त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम या व्यवस्थापकाकडे होते. त्याने ते धनादेश बनावट खात्यांमध्ये जमा केले व नंतर स्वत:च्या खात्यात ती रक्कम वळती करून घेतली. व्यवस्थापक आणि आॅटोरिक्षा चालकाला अटक झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उपरोक्त बँक खाते उघडताना ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) नियमांचे उल्लंघन झाल्याचा व अजूनही ती रक्कम ताब्यात घेण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचा आरोप कंपनीच्या मूळ मालकाने केला आहे. ८३ लाख रुपये गोदाम व्यवस्थापकाने वाहतूक व्यवसायात गुंतविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.सप्टेंबरमध्ये आम्ही आॅडिटरला हिशेबांची तपासणी करण्यास सांगितले होते. ग्राहकांनी मालाचे पैसे दिले होते, परंतु ते आमच्या खात्यात जमा झाल्याचे दिसत नव्हते, असे स्पष्ट झाले. त्यानंतर गोदाम व्यवस्थापक राकेश बन्सल याने खासगी बँकेच्या सांताक्रुझ आणि जोगेश्वरीतील शाखांमध्ये ते धनादेश जमा केल्याचे दिसले, असे श्रीनारायण अँड कंपनीचे भागीदार नारायण करवा यांनी सांगितले. ही कंपनी सिमेंट, कागद आणि अंतर्वस्त्र निर्मितीचा व्यापार करते.करवा म्हणाले की, ‘राकेश बन्सल हा गेल्या चार वर्षांपासून आमच्याकडे कामाला होता व ग्राहकाकडून धनादेश मिळाल्यानंतर त्यांना मालाचा पुरवठा करण्याचे काम त्याच्याकडे होते. स्टेट बँक आॅफ इंडियामधील आमच्या खात्यात त्याने ते धनादेश जमा करणे अपेक्षित होते, परंतु त्याने सांताक्रुझमधील खासगी बँकेत सप्टेंबर २०१४ मध्ये एक खाते उघडले. रिक्षाचालक अखिलेश राय हा श्रीनारायण कंपनीचा मालक असल्याचे राकेशने दाखविले. ही कंपनी स्वयंचलित वाहनांचा व्यवसाय करते व तिची उलाढाल ८० लाख आहे,’ असेही त्याने सांगितले. ‘बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने मुख्यालयाकडून हे खाते उघडण्यासाठी विशेष परवानगी घेतली आणि केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खातेदाराला ६० दिवसांची मुदत दिली. नियमांप्रमाणे केवायसी पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत असते. आमच्या ग्राहकांनी दिलेले ३८ लाख रुपयांचे धनादेश त्याने या बनावट खात्यात जमा करून, नंतर ती रक्कम त्याच्या वैयक्तिक खात्यात वळती करून घेतली,’ असेही करवा पुढे म्हणाले.दोन महिन्यांनंतर कांदिवलीतील बँकेच्या केवायसी कार्यालयाने शाखेला केवायसीची पूर्तता न झाल्यामुळे, बँकेसाठी ही जोखीम असून, ते खाते बंद करण्यात यावे, असे सांगितले. त्यानुसार खात्यातील शिल्लक रक्कम पे आॅर्डरने रिक्षाचालक राय याला देण्यात येऊन बँकेने खाते बंद केले. ३१ मार्च २०१५ रोजी बन्सल याच बँकेच्या जोगेश्वरीतील शाखेत गेला व त्याने वस्त्र निर्माता श्री नारायण कंपनीचा तो स्वत: मालक असल्याचे दाखविले. त्याला सेवाकर क्रमांकही मिळाला व त्याने २४ मार्च २०१५ रोजी कंपनी स्थापन झाल्याचे प्रमाणपत्र चार्टर्ड अकाउंटंटकडून मिळविले. या खात्यात त्याने ४५ लाख रुपयांचे धनादेश जमा केले, असे करवा यांनी सांगितले.करवा यांनी १२ आॅक्टोबरला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात बन्सल, राय आणि रजनी बिश्त यांच्याविरोधात तक्रार दिली. उपरोक्त पैशांतून बन्सलने रजनी बिश्तसाठी फ्लॅट घेतला. त्याने रजनी बिश्तच्या नावाने चालविल्या जात असलेल्या वाहतुकीच्या व्यवसायातही पैसे गुंतविले. ‘माझी तक्रार ही आहे की, पोलिसांनी एकदाही बन्सलची चौकशी केली नाही. बन्सलने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. तथापि, त्याने आपण आजारी असल्याचे न्यायालयात सांगितल्यानंतर, त्याला तेथून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. तिघेही तुरुंगात असताना मला मात्र माझे पैसे परत मिळालेले नाहीत,’ अशी व्यथा करवा यांनी मांडली. करवा म्हणाले की, ‘बन्सलने ५० लाख रुपये किमतीची उत्पादनेही आमच्या ग्राहकांना रोखीने विकल्याचे आम्हाला समजले आहे. अर्थातच, ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झालेली नाही.’
व्यवस्थापकाने मालकाला ८० लाख रुपयांना फसविले!
By admin | Published: December 20, 2015 12:52 AM