चेतन ननावरे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत कार्यरत संगणक शिक्षकांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी नववधू शिक्षिका थेट लग्नमंडपातून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसली आहे. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने सोमवारपासून पुकारलेल्या या आंदोलनात एकूण १० शिक्षक उपोषणास बसले असून त्यात रविवारी, २१ मे रोजी लग्न झालेल्या माया गौतम कांबळे या शिक्षिकेचाही समावेश आहे.कायम सेवेत घेण्याबाबतच्या मागणीची शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. मात्र राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांच्या राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांना अभिप्राय देण्याचे प्रलंबित आहे. पत्रव्यवहार करूनही याप्रकरणी दिरंगाई होत असल्याचा आरोप श्रमिक संघाचे सरचिटणीस जीवन सुरूडे यांनी केला.नोकरीसाठी काय पण..!रविवारी दुपारी लग्न झाले, त्या वेळी आंदोलनाची माहिती मिळाली. सोमवारी पनवेलला सासरी पोहोचले. त्यानंतर लगेचच आंदोलनात सहभागी झाले असून सासरच्या मंडळींचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नववधू शिक्षिका माया चांदणे-कांबळे यांनी सांगितले.
लग्न मंडपातून थेट आंदोलनाच्या मैदानात
By admin | Published: May 23, 2017 3:45 AM