शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

‘मंडणगड’चे जवान राजेंद्र गुजर बेपत्ता

By admin | Published: July 07, 2017 11:14 PM

‘मंडणगड’चे जवान राजेंद्र गुजर बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अरुणाचल प्रदेशात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत राजेंद्र यशवंत गुजर (वय २९, रा. पालवणी जांभूळनगर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हे जवान बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेतील इतर तिघांचे मृतदेह सापडले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी घडली आहे. भारतीय हवाई दलात फ्लाईट इंजिनियर सार्जंट पदावर राजेंद्र गुजर हे कार्यरत होते. मंगळवार, दि. ४ रोजी अरूणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूर आला होता. तेथे बचावकार्यासाठी भारतीय वायुदलाचे एल. एच. धु्रव हे हेलिकॉप्टर तीन अधिकारी व राज्य राखीव दलाच्या एका जवानासह सांगली परिसरातील पिलपुतु येथून निघाले. त्यानंतर धु्रवचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यावेळी युमिसामदोंग या जंगलक्षेत्र परिसराच्या आसपास १५ हजार फूट उंचीवरून हे हेलिकॉप्टर उडत होते, अशी माहिती नियंत्रण कक्षाला समजली होती. खराब हवामानामुळे कक्षाचा हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटल्याने भारतीय सेनेकडून लगेचच शोधकार्य सुरू करण्यात आले.पाच तासाच्या प्रयत्नानंतरही कुणाचाही पत्ता न लागल्याने व खराब हवामानामुळे हे शोधकार्य थांबवण्यात आले. यानंतर पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अरुणाचल प्रदेशमधील पापुम पारे या ठिकाणी हेलिकॉप्टरचे अवशेष व तीन सैनिकांचे मृतदेह सापडले. मात्र, या तीनही मृतदेहांची ओळख पटली असून, त्यात राजेंद्र गुजर यांचा समावेश नाही. अजूनही त्यांचा शोध सुरू आहे.राजेंद्र यांचे बालपण व शिक्षणराजेंद्र गुजर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल पालवणी येथे पूर्ण केले. त्यानंतर मंडणगड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले. महाविद्यालयात कबड्डी खेळात राजेंद्र अग्रेसर होते. बारावी परीक्षेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादन केले होते. वरिष्ठ महाविद्यालयात असताना त्यांनी भारतीय हवाई दलात भरती झाले. अथक मेहनत घेऊन ते फ्लाईट इंजिनियर सार्जंट म्हणून काम करीत होते.शाम गुजर यांच्याशी संपर्क मंडणगड तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी राजेंद्र गुजर यांचे मोठे बंधू शाम गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. परिसरातील हवामान खराब असल्याने उपग्रहाच्या माध्यमातून शोध केला असता तीन मृतदेहांचा शोध लागला आहे. जवानांच्या कपड्यावरील टॅगवर असलेल्या माहितीआधारे त्यामध्ये राजेंद्र यांचा समावेश नाही. त्यांच्या शोधकार्यासाठी मदत पथक घटनास्थळी रवाना झाले असून, आपणही तेथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.माझा मुलगा परत येईल दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये माझा मुलगा असला तरी तो अजून बेपत्ता आहे. तो सुखरूप परत येईल, याची आपल्याला खात्री आहे, असे राजेंद्र यांचे वडील यशवंत गुजर यांनी सांगितले. राजेंद्र यांच्या सुखरूपतेसाठी घरामध्ये पूजा-अर्चाही सुरू आहे.सैनिकी परंपरा असलेले गुजर कुटुंबराजेंद्र गुजर यांच्या घराण्यात सैनिकी परंपरा आहे. त्यांचे वडील यशवंत गुजर तसेच भाऊ आणि काकाही भारतीय सैन्यात होते.