ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी ( अण्णा) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), यश रूईकर ( पुरूषोत्तम करंडक विजेते), चंद्रशेखर देशपांडे ( आॅर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर ( अभिनेत्री व गायिका) आणि दत्तात्रय शिंदे ( सेटिंग) यांना बालगंधर्वविशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.बालगंधर्व पुरस्काराची निवड करण्यासाठी मंगळवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये या पुरस्कारांची निवड करण्यात आली. या निवड समितीत अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांचा समावेश होता. येत्या 26 जून रोजी बालगंधर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी यांनी जवळपास पन्नास वर्षे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. लग्नाची बेडी, पराचा कावळा, उद्याचा संसार, घराबाहेर, तुझ आहे तुझपाशी, अश्रूंची झाली फुले, भावबंधन आदी विविध नाटकांसह जावई माझा भला आणि पांडू हवालदार या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसाउमटविला. शहरात नाट्यगृहांची उभारणी झाल्यानंतर नाट्य प्रयोग, आॅर्केस्ट्रा, संगीत आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली. 1970 मध्ये मनोरंजन नाट्यसंस्थेची स्थापना करून सांस्कृतिक क्षेत्रात व्यवस्थापनामध्ये ही संस्था त्यांनी नावारूपाला आणली. सांस्कृतिक कारकिर्दीत नाट्यदर्पण पुरस्कार, कलागौरव प्रतिष्ठानचा नाट्यगौरव पुरस्कार यांसह नाट्यसृष्टीतील पन्नास वर्षाच्या कामगिरीबददल राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्यह्य आजवर बालगंधर्व पुरस्कारासाठी इतरांचीच नावे सुचवत होतो मात्र हापुरस्कार मला मिळेल असे कधी वाटले नाही. कारण मी अभिनेता नाही. आजवरनाटकामध्ये ज्या काही भूमिका केल्या त्या हौसेपोटी केल्या. पणपुरस्काराचा आनंद नक्कीच आहे. - मनोहर कुलकर्णी ( अण्णा)
मनोहर चिंतामण कुलकर्णी यांना पुणे मनपाचा बालगंधर्व पुरस्कार
By admin | Published: June 13, 2017 9:40 PM