सोलापूर : महापालिकेतील गटबाजीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिका बरखास्तीची तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर अक्षता सोहळा आणि स्नेहभजनाच्या माध्यमातून पालकमंत्री आणि सहकारमंत्री या दोन देशमुखांमध्ये शनिवारी मनोमीलन घडून आले़ दोन्ही गटाचे नगरसेवक आणि महापौर एकमेकांना जेवण वाढतानाचे दृष्य पहायला मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. पालकमंत्री विजयकु मार देशमुख आणि सहक ारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह दोन्ही गटांचे नगरसेवकांची त्यांनी यावेळी कानउघाडणी केली. ‘आता सुधारला नाही तर मात्र महापालिकाच बरखास्त करतो’ असा दमच त्यांनी भरला होता़ सहक ारमंत्री सुभाष देशमुख यांच्या खुलाशानंतर पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी गड्डा यात्रेतील अक्षता सोहळ्याच्या मुहूर्तावर हे भांडण मिटवण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानंतर सोलापुरात दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या़सकाळी भाजपाच्या दोन्ही गटाचे नगरसेवक महापालिकेत एकत्रित आले़ १२़५० वाजता महापौर शोभा बनशेट्टी या आल्या आणि त्यांच्याशी मिसळून हसत बोलू लागल्या़ याचे फोटो सेशन सुरू असतानाच सहकारमंत्री देशमुखांचे आगमनझाले़महापौरांनी त्यांचे स्वागत केले आणि या दोन्ही नगरसेवकांमध्ये थांबून फोटोसाठी पोज दिला़ ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला’चा जयजयकार करत सारेजण मिळून ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी एकत्रित पायी निघाले़ अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्ट्याजवळ दोन्ही गटाचे नगरसेवक आणि दोन्ही मंत्री जवळजवळ बसून राहिले़ काही वेळ त्यांच्यामध्ये गप्पादेखील रमल्या़
मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर सोलापूरच्या दोघा मंत्र्यांमध्ये झाले मनोमीलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:59 AM