शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:50 AM

Chagan Bhujbal on Manoj Jarange: मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजविणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही आघाड्या जोरात करत आहेत. अशातच तिसरी आघाडी निर्माण झाली असून ती देखील पेटून उठली आहे. लोकसभेला भाजपाला फटका बसलेले मराठा आंदोलन पुन्हा एकदा विधानसभेला राजकीय पक्षांची गोची करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजविणार आहे. 

यातच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे. ही लोकशाही आहे. मनोज जरांगे जी भूमिका घेतील ते घेतील, मला तर असे वाटते की त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजेत.  लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आजमवायला हरकत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

 समीर भुजबळ माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबर आहेत. आम्ही काम करत आहोत, असे स्पष्ट करतानाच शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास किंवा महायुतीत काही सीटांवर घासाघिस चालूच राहील, असे संकेत भुजबळांनी दिले आहेत. अनेक नेते फॉर्म पण भरतील, शेवटच्या वेळी काहीजण फॉर्म परत घेतील. मग खरी निवडणुकीची लढाई सुरू होईल, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.  

लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित केल्यावरून भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. फार थोडेसे लोक राहिले आहेत बाकी सगळ्यांचे पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत. 98 टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना पैसे मिळालेले आहेत. ही आमची रेगुलर स्कीम आहे निवडणुकीसाठी असलेली स्कीम नाही, असेही भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४