Manoj Jarange Patil News: पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात. परंतु, अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही. छत्रपतींचा महानाट्य दाखवले म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचा आयोजन केले होते. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिला प्रकरणे पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले.
ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु, मनोज जरांगे यांनी एक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का?
सत्ता आणायला मोदींना छत्रपतींचा आधार लागतो आणि समुद्रातच स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमते. छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. तसेच छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? पुन्हा अटक वॉरंट का काढले? न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे. पैसे दिले होते, त्या मॅटरमध्ये माझा चेक नाही. आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का, मी काय दहशतवादी आहे काय, अशी सवाल जरांगे यांनी केला.