Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे. सरकारला दिलेला वेळ आता संपत आला असून जरांगे पाटील मुंबईत आंदोलनसाठी जाणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथून मुंबईसाठी निघणार आहेत.या आधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते मराठा आरक्षणाबाबत बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात
"माझ मराठ्यांना शेवटच सांगणे आहे मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, मराठ्यांची एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुल संपली पाहिजेत अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते.
"मी समाजाला न्याय दिला पाहिजे, समाजात असेन नसेन याचे मला दु:ख होत आहे.मी समाज सुद्धा बघायला पाहिजे. या उपोषणामुळे मला शरीर जास्त साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची आहे. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मराठ्यांची मुल मोठी व्हावीत म्हणून मुंबईकडे निघालो आहे. मी तुमच्यात असेल नसेल हा विचार संपवू द्यायचा नाही. हे आंदोलन बंद पडू द्यायचे नाही, आथा आरक्षण घेऊन मुलांचे डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
मुंबईपर्यंत पायी चालत जाणार
अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकत? शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे मी रात्रीपासून व्यथीत झालो अस म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आपले लेकरं मेले आहेत. आता ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंआहे. त्यामुळं मी आता अंतरवालीतूनचं आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. या मोर्चादरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.