शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:31 IST

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil News: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यानंतर आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. 

संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचे षड्‍यंत्र केले जात आहे. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचे आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलने करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचे नाही का? जर आरोपीला साथ द्यायचे असे झाले तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. 

धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा

सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे. धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केलेत, षड्‍यंत्र आखलेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. धनंजय मुंडे हे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे आहेत. धनंजय देशमुखांना जर कुणी धमकी देत असेल तर त्याला सोडणार नाही. गुंडांना बोलायचे नाही का? आम्ही कुणाच्या जातीला धमकी दिली नाही. पण नेत्याला आम्ही सोडणार नाही. स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतला जात आहे. पाप करणार तुम्ही, आणि ओबीसींच्या मागे उभे लपायचे. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्या. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात हजार केसेस जरी दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही. धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेOBCअन्य मागासवर्गीय जातीmarathaमराठाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण