- विजयकुमार गाडेकर शिरूर कासार (जि. बीड) - गत सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकल्याने आरक्षणाची राजधानी बनलेल्या जरांगे पाटलांचे जन्मगाव मातोरी येथे आनंदाची त्सुनामी आल्याचे दिसत होते. बहुसंख्य ग्रामस्थ हे मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत आरक्षण दिंडीतगेले असले तरी उर्वरित वयस्कर, महिला, पुरुष, तरुण हा आनंद साजरा करीत होते.गावोगावी फुटले फटाकेआरक्षण मिळाल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच गावोगावी फटाके फोडण्यात आले.
भाऊबीजेची ओवाळणीशिकल्या सवरल्यानंतर नोकरीला होणारा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. शिवाय शिक्षणातील गतिरोधकदेखील दूर झाले. आम्हा सकल मराठा शिक्षित तरुणींना मनोजदादांनी आज भाऊबीजेची जन्मभर पुरेल अशी ओवाळणी दिल्याची प्रतिक्रया भाग्यश्री काळे या मुलीने व्यक्त केली.
समाजाची एकजूटअनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी प्रलंबित होती. अखेर शिरूर तालुक्यातील मातोरी येथील साध्या माणसाने जन्मभूमीत नव्हे, तर कर्मभूमी अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले. समाजमन जाणत लाखावर समाज संघटित केला. संशयाचा कुठेच शिरकाव होऊ दिला नाही. लाखावर नव्हे तर कोटी-कोटी मराठा एकसंघ झाल्याचे चित्र मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळाले.