शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:37 IST

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे.

Manoj Jarange Patil News: राज्यात एकीकडे बीड आणि परभणीतील प्रकरणांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बीड प्रकरणासंदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनातही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसेच सरकारवर निशाणा साधत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचे मनोज जरांगे पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी पूजा करून मनोज जरांगे पाटील यांनी गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होत आहे. त्यांना आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे त्यांना बळ मिळू दे, सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे सांगितले. नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असे वाटत आहे. सुख आमच्या वाट्याला नाही. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे. खरे नवीन वर्ष ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

शेवटची टक्कर द्यायची, अंतिम लढाई करून आरक्षण मिळवायचे आहे

राज्यात बहुमताच सरकार आहे. तेव्हादेखील हेच होते ना. नुसते खांदे बदलले. पूर्वीही तेच होते आत्ता ही तेच आहेत . मराठ्यापुढे सरकार काही करत नाही. आमचे आंदोलन सरकार गांभीर्याने घेईल का नाही, हे आम्ही बघू आता. आतापर्यंत ढकलाढकली होती . आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांना २५ तारखेपर्यंत काही बोलणार पण नाही, नंतर सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मी कोणाला अडसर नाही. एकनाथ शिंदे यांना विचारा की, मी अडसर आहे का ते. आता लक्षात येईल. कारण आता तेच मुख्यमंत्री आहेत. २५ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढतेत की नाही, ते स्पष्ट होईल. आमरण उपोषण २५ जानेवारीला फायनल आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयावर समाधानी असण्याचे कारण नाही . मस्साजोग आणि परभणीत जीव गेला. मस्साजोग प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत. धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहिती नाही . मला एवढेच माहिती आहे , या प्रकरणात जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण