- जमीर काझी मुंबई : मंत्री व सनदी अधिकाºयांच्या दिमतीसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली मात्र नादुरुस्त झाल्याने मंत्रालयाच्या परिसरात कित्येक वर्षांपासून पडून असलेली वाहने हलविण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने ती त्वरित अन्यत्र स्थलांतरित करावीत, असा आदेश गृह विभागाने वाहनांची मालकी असलेल्या संबंधित विभागांना दिला.होंडा सिटी, फोर्ड, हुंदाई, मारुती एस्टिम आदी चार वाहने मंत्रालय परिसरात तर अन्य १६ वाहने प्रशासकीय भवन परिसरात पडून आहेत. या सर्व वाहनांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.राज्यातील प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मंत्री, वरिष्ठ अधिकारी व अन्य अधिकाºयांना कार्यालयीन वापरासाठी शासकीय वाहन पुरविले जाते. त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित विभागाकडे असते. संबंधित विभागांनी नादुरुस्त वाहने दुरुस्त न करता अधिकाºयांसाठी नवीन वाहने खरेदी केली. त्यामुळे धूळखात पडलेल्या नादुरुस्त वाहनांचा गैरकृत्यासाठी वापर करून घातपात घडविला जाण्याची शक्यता असल्याचा सविस्तर अहवाल मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने बनविला आहे. त्यामुळे ही वाहने सध्याच्या ठिकाणांवरून हलवून त्याबाबत पुढील कार्यवाही केली जावी, असा प्रस्ताव गृह विभागाकडे पंधरा दिवसांपूर्वीच पाठविण्यात आला होता. त्यानुसार ही वाहने तातडीने अन्यत्र हलविण्याचीसूचना गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिली आहे.लिलावातून विक्रीनादुरुस्त वाहने संबंधित विभागाकडून भांडारगृहाकडे पाठविली जातील. त्यानंतर जाहीर लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्यात येऊ शकते. त्याबाबतचा निर्णय संबंधित विभागांकडून घेण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने निकालात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:01 AM