शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

रिझवानचे अनेक दिवस गोव्यात वास्तव्य

By admin | Published: January 26, 2016 3:09 AM

इंडियन मुजाहिद्दीनच्या बाबतीत थंड पडलेला महाराष्ट्र एटीएसचा तपास आता पुन्हा वेग घेत आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रिझवानने गोव्यात एका अपार्टमेंटमध्ये जागा भाड्याने घेऊन काही

डिप्पी वांकाणी,  मुंबईइंडियन मुजाहिद्दीनच्या बाबतीत थंड पडलेला महाराष्ट्र एटीएसचा तपास आता पुन्हा वेग घेत आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रिझवानने गोव्यात एका अपार्टमेंटमध्ये जागा भाड्याने घेऊन काही काळ वास्तव्य केल्याचेही समोर येत आहे. एटीएसने केलेल्या तपासात असे आढळून आले आहे की, रिझवान हा गोव्यात काही महिने एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. भाड्यापोटी त्याने ३० हजार रुपये भरल्याचेही समोर आले आहे. गोवा -कर्नाटकमधील खाण माफियांकडून रिझवान डिटोनेटर्स खरेदी करण्यासाठी गेला होता का? याचा तपास सद्या सुरू आहे. कारण, इंडियन मुजाहिद्दिनने देशभरातील आॅपरेशनसाठी एकाच प्रकारचे डिटोनेटर्स, स्फोटके खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रिझवानचा ‘हॅण्डलर’ यूसूफ याने डिटोनेटर्स खरेदी करण्यास रिझवानला सांगितले होते का, याचाही तपास एटीएस करीत आहे.मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या मुदब्बीर शेखकडे मोठ्या प्रमाणात पैसा हस्तांतरीत करण्यात आला होता. मुदब्बीरकडे तरुणांना भरती करण्याची जबाबदारी होती. शहरातील दोन मोठे हवाला आॅपरेटर्स सद्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ज्यांनी मुदब्बीरशी ५.८ लाख रुपयांची देवाणघेवाण केली. यातील ५० हजार रुपये औरंगाबादेतून पकडण्यात आलेल्या इब्राहिमला देण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणीतून पळून गेलेल्या आणि पुन्हा परत आलेल्या वाजिद शेख आणि नूर मोहम्मद या दोन तरुणांचे भविष्य आता रिझवानच्या जबाबावर अवलंबून आहे. हे दोघे तरुण अतिरेकी कारवायात सहभागी होण्यासाठी गेले मात्र, पुन्हा परत आले. आपण निर्दोष असल्याचे हे दोघेही तपास अधिकाऱ्यांपुढे सांगत आहेत. त्यामुळे या दोघांबाबत रिझवान काय सांगतो हे महत्वाचे आहे. आता रिझवानला थेट त्यांच्या समोर आणले जाईल.पणजी : गोव्यावर लिक्विड बॉम्बहल्ला करण्याचा इसिसचा डाव होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) उघडकीस आणली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हरिद्वार येथे अटक केलेल्या इसिसच्या हस्तकांनी चौकशीदरम्यान ही कबुली दिली. गोव्यात हल्ला करण्यासाठी जागाही निश्चित केली होती आणि स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारे हायड्रोजन पॅरॉक्साइड, गन पावडर, पाइप व इतर साहित्यही जमा करण्यात आले होते. परंतु सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा डाव उद्ध्वस्त करताना या मोहिमेत गुंतलेल्या अतिरेक्यांना अटक केली. नेमका कोणत्या ठिकाणी आणि केव्हा हल्ला घडवून आणण्याचा डाव होता, याची माहिती मात्र सुरक्षा यंत्रणेने गुप्त ठेवली आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर आणि त्याच्या दोन साथीदारांनी भारताविरुद्धच्या आॅपरेशनसाठी इसिसशी हातमिळवणी केली असल्याचे सांगितले जाते. तथापि, इंडियन मुजाहिद्दीनचा युसूफ ऊर्फ शफी अम्मार याची सीरियात इसिसमध्ये भरती करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. भारताविरुद्धच्या कारवायांसाठीच ही भरती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.