- नरेश डोंगरेनागपूर : अनैतिक संबंध असो, प्रेमसंबंध असो की, कुणी कुणावर केलेला बलात्कार असो; त्यातून कुण्या महिला, मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती काहीजण सांगत आहेत.राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आर्वीतील डॉ. रेखा कदम आणि त्यांच्या साथीदाराच्या पापाचे खोदकाम पोलिसांनी सुरू केले आहे. ‘लोकमत’ने या संबंधाने विस्तृत माहिती प्रकाशित करून हे प्रकरण जनतेच्या न्यायालयात आणल्यामुळे आता पोलीस यंत्रणेसोबतच आरोग्य यंत्रणेचेही कान टवकारले. या पार्श्वभूमीवर, गोपनीयता बाळगून कसून तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. मात्र, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतील मंडळींनी खासगीत बोलताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. त्यानुसार, कुणाच्या वासनेला बळी पडणाऱ्या पीडित महिला, मुलीचा गर्भपात डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये बिनबोभाट केला जात होता. प्रेमसंबंध असो किंवा अनैतिक संबंध ठेवणारे आरोपी महिला किंवा पीडित मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर सरळ या हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. तेथे डॉ. रेखा कदम आरोग्य यंत्रणेत असलेल्या काही मंडळींची साथ असल्याने संबंधित महिला, मुलीचा गर्भपात करीत होत्या. गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन सरकारी दवाखान्यातून कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचत होती. ‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनात खळबळया गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने १२ जानेवारीला जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून चौकशीला सहकार्य करण्यासाठी विनंती केली. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला त्यांना एक पत्र पाठविले. शुक्रवारी ‘लोकमत’ने या प्रकरणाची पाळेमुळे खोदली. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. वरिष्ठ पातळीवरून संबंधितांना विचारपूस सुरू झाल्यामुळे यंत्रणेने हालचाल सुरू केली.आडवळणाला गाव, म्हणून इकडे धावआर्वी हे खेडेवजा छोटे शहर वर्धा येथून सव्वा तासाच्या अंतरावर आहे. तेवढ्याच अंतरावर अमरावती शहरही आहे. आर्वीच्या तुलनेत वर्ध्यात चांगल्या सुविधा असलेली हॉस्पिटल्स आहेत. त्याहीपेक्षा अद्ययावत आरोग्य सुविधा अमरावती आणि नागपूरच्या हॉस्पिटल्समध्ये मिळतात. असे असताना आडवळणाला असलेल्या आर्वीमध्ये जाऊन गर्भपात करून घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. महिन्याला ५ ते १०, तर वर्षभरात ७० ते १०० गर्भपात आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये होत होते, अशी माहिती पुढे येत आहे.सातवर्षीय मुलीला अंधत्वआर्वी : सातवर्षीय मुलगी आजोबासोबत वसंतनगर येथे दिवाळीसाठी आली होती. तिला ताप आल्याने डॉ. रेखा हिचे पती डॉ. कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, चुकीच्या पद्धतीने केलेल्या औषधोपचारामुळे मुलीच्या दोन्ही डोळ्यांंना पूर्ण अंधत्व आले. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने डॉक्टर कदम यांनी चुकीचे औषधोपचार केले असा निर्णय देत २५ लाख रुपये दंड आणि ९ टक्के व्याजाची रक्कम तसेच आईला २० हजार रुपये भरपाईचा आदेश दिला.
गर्भपात करायचा का? तर चलो आर्वी! पापाचे खोदकाम सुरू असताना धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 6:57 AM