शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

राज्याच्या भागीदारीमुळे अनेक रेल्वे मार्ग रखडले

By admin | Published: June 24, 2014 12:48 AM

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवे रेल्वे मार्ग टाकण्याचे काम त्या-त्या राज्यातील सरकारच्या भागीदारीतून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील अनेक रेल्वे मार्ग रखडले असल्याची माहिती समोर

सांगली : पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या खोकीधारकांना स्टेशन चौकातील संकुलात गाळे देण्यात आले आहेत, त्यांच्याशी किती वर्षांचा करार करायचा, यावरून सोमवारी महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षात जुंपली. एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर महापौर कांचन कांबळे यांनी २९ वर्षाच्या कराराने हे गाळे देण्यात येतील, असा निर्णय घेतला. सांगलीतील स्टेशन चौकात खोकीधारकांच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत दोन व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. याठिकाणी गाळ््यांचे वाटप झाले असले तरी त्यांना किती वर्षासाठी हे गाळे द्यायचे, यावरून वाद सुरू होता. महापालिकेने नऊ वर्षाच्या करारपत्राने गाळे देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. खोकीधारकांनी यास विरोध दर्शवून कायमस्वरूपी गाळे देण्याची मागणी केली होती. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ७५ वर्षांच्या कराराची मागणी केली. मिरजेत काही दुकानगाळे ७५ वर्षाच्या करारपत्राने देण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी दिल्यानंतर विरोधी सदस्यांनी हाच धागा पकडून सांगलीतील खोकीधारकांनाही ७५ वर्षांच्या कराराने गाळे देण्याची मागणी केली. हा धोरणात्मक निर्णय असल्याने हा विषय स्थायी समितीकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेखर माने यांनी केली. यावर विरोधी पक्षाने संताप व्यक्त केला. भाजपचे पृथ्वीराज पवार यांनी हा विषय स्थायीच्या अखत्यारित होता, तर मग महासभेच्या विषयपत्रिकेवर का घेतला, असा सवाल केला. विरोधी गटातील दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, धनपाल खोत यांनीही हा विषय महासभेत आल्याने याचठिकाणी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. सांगलीच्याच स्टेशन चौकातील मॉलला दीर्घ मुदतीच्या करारावर जागा दिली जात असताना खोकीधारकांनाच नऊ वर्षाचा करार लावण्यात आल्याबाबत विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. किशोर जामदार यांनी तो करार बीओटी (बांधा,वापरा व हस्तांतर करा) तत्त्वावरचा नसल्याचे सांगितले. मिरज व सांगलीतील करारपत्रात दुजाभाव न करता यापूर्वी केलेल्या करारपत्रांचा अभ्यास करून निर्णय घेण्याची मागणी सदस्यांनी केली, मात्र महापौरांनी २९ वर्षाच्या कराराचा निर्णय घेतला. शौचालय अनुदान योजना, सुलभ शौचालय, नियुक्त खासगी एजन्सीज्च्या विषयावरूनही सभागृहात गोंधळ झाला. शौचालय अनुदान योजनेचा बोजवारा उडाल्याचा आरोप सदस्यांनी केला. ही योजना रखडल्यामुळे महापालिकेचे अनुदान शासनाने थांबविले आहे का, असा सवाल उपस्थित केला. या गोष्टीसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी असे कोणतेही अनुदान शासनाने थांबविले नसल्याचे सांगितले.