मुंबई : मुंबईतील सुमारे ३० शाळांमधील अनेक शिक्षकांचे मान्यतेचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने लावला आहे. शिवाय, तत्काळ संबंधित शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिला आहे.बोरनारे यांनी सांगितले की, ‘तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या मान्यता शिबिरातील अनेक शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव निर्णयाअभावी तत्कालीन शिक्षण निरीक्षकांनी प्रलंबित ठेवले आहेत. या प्रस्तावाच्या फाइल्स सध्या पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे आहेत. शिक्षण निरीक्षक कार्यालयाने फाइल्स मार्गी लावण्यासाठी आयुक्तांकडे मान्यता शिबिर आयोजित करण्याची मागणी केली आहे, तसेच याबाबत आमदार रामनाथ मोते यांनीसुद्धा शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निर्णय तातडीने करण्याची मागणी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,’ असे बोरनारे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अनेक शिक्षक मान्यतेच्या प्रतीक्षेत
By admin | Published: July 18, 2016 5:02 AM