शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अनेक बाबींचा झाला उलगडा

By admin | Published: September 01, 2015 2:15 AM

एप्रिल २०१२मध्ये झालेल्या शीना बोराच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी गेल्या मंगळवारी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना अटक केली होती

मुंबई : एप्रिल २०१२मध्ये झालेल्या शीना बोराच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी गेल्या मंगळवारी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकात्यातून अटक केली होती. याप्रकरणी आत्तापर्यंत इंद्राणीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आणि मृत शीनाचा भाऊ मिखाईल बोरा, तिसरा पती पीटर मुखर्जी, तसेच त्याचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आणि शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी यांच्याकडे आयुक्त राकेश मारिया यांच्यासह तपास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आहे. त्यातून या हत्याकांडामागील अनेक बाबींचा उलगडा झाला आहे. तरीदेखील शीनाच्या खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.इतर बाबींबरोबरच मिखाईलला केलेल्या विषबाधेबाबत विचारणा करावयाची आहे, तसेच पेण येथून मिळालेल्या मानवी सांगाड्याबाबत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचे सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्याला विरोध करतानाच, पोलिसांनी इंद्राणीला वैयक्तिकपणे भेटू दिलेले नाही, भेटीवेळी पोलीसही तिथे उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला. इंद्राणीची प्रकृती ठिक नसल्याने तिला घरातील जेवण व औषधे देण्याची मागणी त्यांनी केली. त्याला सरकार पक्षाने आक्षेप घेतले, हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे असल्याने अन्नातून विषबाधा होण्याची भीती व्यक्त केली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे ग्राह्य धरत बचाव पक्षाची मागणी अमान्य केली. मात्र सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार औषधे देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. खुनाचा प्रयत्नाचेही कलमया तिघांनी आपल्याला वरळी येथील निवासस्थानी बोलावून शीतपेयातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, असा जबाब मिखाईल बोराने पोलिसांकडे दिला आहे. पोलिसांनी मिखाईलच्या हत्येसाठी आणलेली सुटकेसही जप्त केली आहे. याप्रकरणी तिघा आरोपीवर मिखाईलच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ३०७ व विष दिल्याबद्दल ३२८ हे अतिरिक्त कलम लावण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.शिना बोरा खून प्रकरणी पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभागातील जातपडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांची चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिना बोरा हत्येप्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जीसह तिचा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांना अटक करण्यात आली आहे.शिनाची २०१२ मध्ये निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह पेणजवळ टाकून देण्यात आला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक मिरगे तेथे नेमणुकीस होते. अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतरही घटनास्थळाला भेट दिलेच्या नोंदी पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये करण्यात आलेल्या नव्हत्या. या प्रकरणी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.