ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २१ - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी तळोजा - डोंबिवली - कल्याण असा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत या मार्गाचा डी पी आर तयार करण्याचे निर्देश एम एम आर डी ए ला दिले असून कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो सोबतच हा प्रकल्पही हाती घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.