“मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:48 AM2023-10-31T09:48:17+5:302023-10-31T09:49:22+5:30

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र झाले असून, आमदार, खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

maratha agitor made phone and demands ncp mp amol kolhe should resign for maratha reservation | “मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

“मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये यांना आग लावण्याचे प्रकार घडल्याचे दिसत आहेत. यातच आता एका आंदोलकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना थेट फोन करत, मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, अशी मागणी केली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारखाच आवाज असणारी संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अन् केंद्र सरकारवरचा दबाव वाढवावा अशी मागणी एका मराठा आंदोलक बांधवाने केली.

मराठा आरक्षण हे राज्य नव्हे तर केंद्र सरकारच देऊ शकते

सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, अशावेळी केवळ आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे देऊन प्रश्न मिटणार नाही. तर राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांनी राजीनामे देऊन केंद्र सरकारवर दबाव वाढवावा. कारण मराठा आरक्षण हे राज्य नव्हे तर केंद्र सरकारच देऊ शकते. फोनवर खासदार कोल्हे यांच्याशी बोलताना मराठा बांधवाने अशी मागणी केली. तुम्ही राजीनामा द्याल आणि त्याची आम्ही वाट पाहू. अमोल कोल्हे यांच्या सारखाच आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. पण हा आवाज खासदार अमोल कोल्हे यांचाच आहे, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्या आधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता दोन खासदारांनी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
 

Web Title: maratha agitor made phone and demands ncp mp amol kolhe should resign for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.