शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मराठा समाजाचा कार्ला फाटा येथे चक्काजाम

By admin | Published: January 31, 2017 6:50 PM

मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ૪५ मिनिटे चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 31 - मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आज सकल मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ૪५ मिनिटे चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने हा चक्का जाम करण्यात आला होता.कार्ला फाटा येथे आयोजकांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सकाळी ११ वाजता पुष्पहार अर्पण करत उपस्थित समाज बांधवांना चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता वाचन करून दाखविण्यात आली. शांततेच्या मार्गाने हे चक्काजाम आंदोलन करत मराठा समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. काही समाज बांधवांनी यावेळी आपली मनोगते व भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले समाजाने महाराष्ट्रात ५७ ठिकाणी शांततेच्या मार्गाने मूकमोर्चे काढत शासनापर्यंत समाजाच्या मागण्या पोहोचविल्या. लाखोंच्या संख्येने समाज बांधव व भगिनी या मूकमोर्चांमध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनांची दखल जगभरात सर्वत्र घेतली गेली. मात्र डोळ्यांवर पट्टी व कानावर हात ठेवलेल्या सरकारने या आंदोलनांची दखल घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात वेळकाढूपणा सुरू असल्याने समाजाला आज चक्काजाम सारखे आंदोलन करावे लागले. मात्र समाजाने ते देखील शांततेच्या मार्गाने केले. मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये, समाजाचा ज्वालामुखी भडकल्यास तो शांत होणार नाही याकरिता शासनाने मराठा समाजाच्या मागण्याची तात्काळ दखल घेत त्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तब्बल ૪५ मिनिटे सकल मराठा बांधवांच्या वतीने चक्काजाम करण्यात आल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजता राष्ट्रगीताने या चक्का जामची सांगता करण्यात आली. चक्का जाम आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त कार्ला फाटा येथे सकाळपासून तैनात करण्यात आला होता.