मुंबई - अनेक वर्षांपासून मागणी होत असलेला मराठा आरक्षण कायदेशीर असल्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षणावर शिक्कामोर्तब होताच,विविध क्षेत्रातून प्रतिकिया येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिकिया दिल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आरक्षणासाठी विरोधी पक्षाने सातत्याने सभागृहात पाठपुरावा केला, आंदोलनात सहभाग घेतला. शेवटी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला याचे समाधान वाटते असे मुंडे म्हणाले.
मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे. विरोधीपक्षाने सातत्याने या मागणीबाबत पाठपुरावा केला, शेवटी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला याचे समाधान वाटते.
#MarathaReservationpic.twitter.com/LOUoFTFkOk
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 27, 2019
मागील पाच वर्षांपासून विरोधीपक्ष मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पद्धतीने सभागृहात मागणी करत होते. याच काळात मराठा आरक्षण मिळावे म्हणून ते रस्तावर सुद्धा उतरले. त्यानंतर सरकारने आरक्षण जाहीर केले होते. मात्र, आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका करण्यात आल्याने हे प्रकरण अनेक दिवसांपासून न्यायालत अडकले होते. मात्र अखेर यावर आज अंतिम निकाल आले आणि मराठा समाजाला दिले गेलेलं आरक्षण वैध ठरलं.