शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

मराठा क्रांती मोर्चा राजकीय आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 5:47 AM

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय

चेतन ननावरे / मुंबईगेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा आगामी निवडणुकांत संबंधित राजकीय पक्षांचे पानिपत करू, असा इशारा देण्यात आला आहे.राज्यात विविध २६५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात मराठा समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. काही पक्षांकडून छुप्या पद्धतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उघडपणे या मोर्चांना आणि मोर्चाच्या मागण्यांना कोणत्या पक्षांचा पाठिंबा आहे, हे जाणून घेण्याचा निश्चय मराठा क्रांती मूक मोर्चाने केला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे.मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील यांनी सांगितले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर करावी. भूमिका जाहीर करताना निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत पक्षाने स्पष्टता ठेवण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.