शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Maratha Kranti Morcha : म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणे गरजेचे

By बाळकृष्ण परब | Published: July 26, 2018 2:09 PM

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठ्यांना आरक्षणाची कशी गरज आहे इथपासून ते इवढी वर्षे राज्यापासून गावपातळीपर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या या समाजाला आरक्षणाची काय गरज? इथपर्यंतची मतमतांतरे व्यक्त होत आहेत. मराठा समाजाबाबत वर्षांनुवर्षांपासून असलेल्या समज गैरसमजांचा त्यात मोठा वाटा आहे.मराठा समाज म्हणजे सत्ताधारी, शिवकाळापासून महाराष्ट्राच्या रहाटगाडग्याची सूत्रे आपल्या हाती ठेवणारा, स्वातंत्र्यौत्तर काळात राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत नेतृत्व करणारा, हाती जमीनजुमला असलेला वर्ग या म्हणण्यात बहुतांशी तथ्थ आहे, नाही असे नाही. पण ते पूर्ण सत्य नाही. मराठा ही महाराष्ट्रात सत्ताधारी जात असली तरी प्रत्येक मराठा कुटुंबाला सत्तेतून मिळणारे लाभ मिळालेले नाहीत. लाखो मराठा कुटुंबे राजकारणापासून दूर आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे जमिनीचा. मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी. पण आजही जमीनदार म्हणावी अशी मराठा कुटुंबे मोजकीच आहेत. गावठी दोन चार एवढ्या प्रमाणात. बाकीचा बहुतांश मराठा समाज हा मध्यम आणि अल्पभूधारक आहे. असे असले तरी आपल्या "मराठा" असण्याच्या भावनेतून या वर्गाने भूतकाळात कुठल्याही शासकीय सोईसुविधांची मागणी केलेली नव्हती. वडिलोपार्जित शेती करावी आणि उदरनिर्वाह चालवावा हा या समाजाचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला शिरस्ता. पण कालौघात वाढलेली लोकसंख्या, त्यातून जमीनीचे झालेले तुकडीकरण, लहरी हवामानामुळे आलेली अनिश्चितता आणि जागतिकीकरणानंतर शेतीची जागतिक बाजारपेठेत झालेली फरफट यामुळे मराठा समाजातील बहुतांश कुटुंबांच्या एकंदरीत सामाजिक स्थितीला हादरे बसले. हाती फार पैसा नसल्याने उच्च शिक्षण घेणे कठीण होऊन बसले.एकीकडे आपली अशी अवस्था असताना इतर समाज आरक्षणाच्या माध्यमातून विविध लाभ घेताहेत. त्यांना शैक्षणिक सुविधा आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळतेय. जे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला भरमसाठ फी द्यावी लागते, तेच शिक्षण इतरांना अत्यल्प खर्चात मिळते, हे पाहून मराठा समाजात अन्यायाची भावना तीव्र झाली. तसेच मराठे आणि इतर अशी दरी निर्माण झाली. एखाद्या मराठा तरुणाला विचारले असता तो याबाबत पोटतिडकीने बोलतो. पण मराठे म्हणजे घरंदाज, पुढारलेले अशीच प्रतिमा आपल्याकडे उभी राहिलेली असल्याने मराठा समाजाला दिलासा मिळेल अशी पावले वेळीच उचलली गेली नाहीत. अगदी राज्यातील सत्तासूत्रे मराठ्यांच्या हाती असतानाही आपल्या जातीबांधवांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटले नाही. कदाचित खाजगी शिक्षण संंस्थांचे जाळे विणण्यात व्यस्त असल्याने त्यांना वेळ मिळाला नसावा. पण या सर्वांमुळे लाखो मराठा विद्यार्थी गुणवत्ता असूनही आर्थिक पाठबळ नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहिले. त्यांची शैक्षणिक पिछेहाट होत गेली. शेती करावी तर उत्पन्नाची हमी नाही आणि नोकरी करावी तर दर्जेदार शिक्षण नाही आणि ज्यांच्याकडे शिक्षण आहे त्यांना पात्रतेनुसार नोकऱ्या नाहीत. यामुळे अनेक मराठा तरुणांचा कोंडमारा झाला. त्यातून असंतोष वाढला. अखेर याच असंतोषाची परिणती मूक मोर्चात झाली. आरक्षण मिळाल्यास आपल्या किमान काही तरी समस्या सुटतील, अशी मराठा समाजाची भावना आहे. पण आज आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय. कोर्टकचेऱ्या चालू आहेत. त्याला प्रत्युत्तरादाखल मूक मोर्चाचा ठोक मोर्चा झालाय. हिंसाचार, जाळपोळ झाली. स्पष्टच सांगायचं तर हे चुकीचं आहे. त्यातून आरक्षण मिळण्याची आणि मिळालं तर ते टिकण्याची अजिबात शक्यता नाही. पण मराठा समाजातील एक मोठा वर्ग खरोखरच बिकट अवस्थेत आहे. त्याला सावरणे गरजेचे आहे. त्यासाठी सद्यस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणे हा तातडीचा उपाय आहे. मग ते आरक्षण जातीय निकषांवर मिळो वा आर्थिक निकषांवर!!!

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाreservationआरक्षण