शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

Maratha Kranti Morcha : मराठवाड्यात धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:18 AM

गंगाखेडला बस जाळली; हिंगोली, लातुरात दगडफेक

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. सोमवारी काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. गंगाखेड येथे आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड करीत एक बस पेटवून दिली. हिंगोली, लातूर येथेही बसेसवर दगडफेक झाली.परळीत ठिय्या आंदोलन सुरूच असून, नांदेड, जालना जिल्ह्यात रास्ता रोको झाला. परळीत आंदोलनस्थळी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सायंकाळी पाटोदा तालुक्यात शिवनेरी व बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. पाटोदा येथे आमदार भीमराव धोंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना आंदोलकांच्या भावना कळविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.परभणी जिल्ह्यात गंगाखेडला दहा गाड्या फोडण्यात आल्या. एक बस जाळली. आंदोलक हिंसक झाल्याने परभणीहून आलेल्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला़ दोन पत्रकारांनाही मारहाण झाली़ त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ आमदारडॉ़ मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली़ नांदेड, हिंगोली, लातूर, जालना जिल्ह्यातहीआंदोलन झाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाNandedनांदेडHingoliहिंगोलीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद