पुणे : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, यासाठी निघत असलेल्या मराठा समाजाच्या भव्य मूक मोर्च्यांपासून प्रेरणा घेऊन दुबईमधील समाज बांधवांनीही एकत्र येऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.दुबईमध्ये मोर्चा किंवा रॅली काढायला बंदी आहे. त्यामुळे शहरालगतच्या एका वाळवंटी भागात सर्वांनी एकत्र येऊन, आपल्या भावना व्यक्त केल्या. दुबईमधील जवळपास ७० मराठा नागरिक यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, ही समाजाची मागणी योग्य असून शासनाने यावर गांभिर्याने विचार करावा. मराठा समाजावर होणारा अन्याय दुर्लक्षित केला जातो. त्याला वाचा फोडण्याची आवश्यकता आहे, असेही मत समाज बांधवांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
मराठा क्रांती मोर्चाला दुबईतूनही पाठिंबा
By admin | Published: October 13, 2016 6:43 AM