शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 7:50 AM

Maratha-Kunbi : सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांना कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता. १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर - सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांना कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता. १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे. त्या गॅझेटियरच्या ई-आवृत्तीमध्ये मराठा व कुणबी एकच असल्याचा उल्लेख २००६ साली वगळण्यात आला. मात्र, मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक उल्लेख गॅझेटमध्ये सापडतात. 

मराठा आरक्षण न्याय हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र बनसोड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. निजामाच्या काळातील गॅझेटियर ऑफ द निजाम्स डमेनिअसन्स औरंगाबाद डिस्ट्रिक्ट- १८८४ नुसार एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या २,८८,८२४ होती. एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ४०.६३% होते. हा कुणबी समाज म्हणजेच मराठा हाेय. 

१८८१ च्या जनगणनेतही एकच जात अशी नाेंद - मराठा कंट्री, मराठा बुक्स, मराठा ब्राह्मण असे उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहेत. कुणबी हा उल्लेख हा आजच्या मराठा जातीसाठीच असल्याचे विविध संदर्भातून स्पष्ट होते, असेही प्रा. बनसोड यांनी सांगितले. - याविषयी डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी संशोधन केले असून, त्यांच्याकडे गॅझेटची मूळ प्रत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा एकच असल्याची नोंद केल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMarathwadaमराठवाडा