पुणे :सरकार अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ९ ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा सकाळ समाजाच्यावतीने इशारा देण्यात आला.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात आली.त्यावेळी सांगण्यात आले की, ९ ऑगस्ट रोजी कुठे, काय होईल आणि कसा मोर्चा काढला जाईल हे कोणाला कळणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका.गेल्या दोन वर्षांपासून अतिशय शांततेत निघालेल्या या मोर्च्याला काही समाज कंटकांडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारकडूनही मराठा समाजाच्या मोर्च्याबाबत अपप्रचार होत आहे असा आरोपही करण्यात आला. आंदोलनदरम्यान सरकारने मराठा समाजाच्या युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत,अन्यथा समाजातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल असेही सांगण्यात आले.या विषयावर रविवारी (दि२९)रोजी पुण्यातील डेक्कनयेथील स्मारकाजवळ ठिय्या आंदोलन करणार येण्यात असल्याचे जाहीर केले,
येत्या दोन दिवसात या विषयावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा.त्यासंबंधी तोंडी नाही तर लेखी आश्वासन द्यावे नाहीतर ९ ऑगस्टला काय होईल याची कल्पना महाराष्ट्र सरकार करू शकणार नाही असेही नमूद करण्यात आले. पंढरपूर वारीच्या यात्रेत साप आहे अशी ऑडिओ क्लिप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरच करावी. अन्यथा २०१९च्या प्रचारात फिरकूही देणार नाही असेही सांगण्यात आले. यावेळी शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, रघुनाथचीत्रे पाटील, धनंजय जाधव, विकास पासलकर उपस्थित होते.