मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू केला. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा ठपका ठेवत यंदा आरक्षणाचा लाभ देण्यास न्यायालयाने मनाई केली. उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. राज्य सरकारने या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते गुरुवारी विधानसभेत मांडले होते. तेथे हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. शुक्रवारी विधान परिषदेतही हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील मराठा आरक्षण विधेयक विधान परिषदेतही मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:29 AM