मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. यानंतर सरकारनं आरक्षणाबद्दलचं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडलं. या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक एकमतानं मंजूर झालं. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही निकषांवर मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगानं नोंदवला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 2:43 PM