दासगाव/ कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात ६ जून या शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगड येथून करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे कोरोनाचे कारण देत गडाच्या वाटांची नाकेबंदी करून शिवभक्तांना अडविले जात आहे. छ. संभाजीराजे यांच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून हा राज्याभिषेक साजरा होणार आहे. पोलीस प्रशासनाने रायगडाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली आहे.
Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 8:15 AM