शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर स्पष्टवक्ते, मी त्यांना मानतो, पण...; मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:54 AM

माझा एकाही जातीसमुदायाला विरोध नाही. कुणीही मला हाक मारली तरी मी सहकार्याला उभा राहतो असं जरांगे पाटील यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर - प्रकाश आंबेडकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आमच्यातही तरुणमंडळी त्यांना मानतात. कारण ते स्पष्ट आणि खरे बोलतात. मग कुणीही असो. त्यांच्या स्पष्टपणाला मी मानतो. त्यामुळे त्यांचा सल्ला मला मान्य आहे असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर दिले आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मी १०० टक्के मानतो. पण मला सल्लागार कुणी नाही.मी कुणाचे सल्ले मानत नाही पण त्यांचा मान्य करतो. कारण त्यांच्याकडे प्रामाणिकपणा आणि स्पष्टपणा आहे.ते कायद्याचे,संविधानाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे जर यशस्वी व्हायचे असेल तर अशा व्यक्तीचा सल्ला ऐकला पाहिजे या मताचा मी आहे. माझ्या आणि त्यांच्या वयात खूप फरक आहे. मला त्यांचा सल्ला मान्य आहे. परंतु मला सल्लागार नाही. हे अंतिम सत्य आहे. कुणीही शोधून दाखवावे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. काहीजणांनी वेगळ्या समुदायाकडे पाहून ते विधान केले असं पसरवलं. मला काय बोलायचे आहे हे समजून न घेता विनाकारण एका समुदायाबाबत बोलले. माझ्या पट्ट्यात पाहा, माझा एकाही जातीसमुदायाला विरोध नाही. कुणीही मला हाक मारली तरी मी सहकार्याला उभा राहतो. त्यामुळे कोणतीही जातधर्म असो, माझ्या मनात त्यांच्याबद्दल आणि त्यांना माझ्याबद्दल खूप आदर आहे. माझ्या विधानाचा वेगळा अर्थ घेऊन काहीजणांनी त्यात राजकारण केले.परंतु आजपासून मला शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य आहे. पण मला त्यादृष्टीने म्हणायचे नव्हते. विनाकारण अंगावर ओढून घेतले. हा लढा मोठा असून त्याच्याबद्दल राज्यात संभ्रम निर्माण करायला नको असंही स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिले. 

दरम्यान, निष्पाप लोकांवर गुन्हे नोंदवणार नाही असं सरकारने म्हटलं होते. परंतु अंतरवाली सराटीत काही जणांना अटक केले. मला अजून सविस्तर माहिती नाही. मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा अधिकृत माहिती घेतल्यावर बोलेन असं जरांगे म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांनी काय दिला होता सल्ला?जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. जरांगे पाटील यांना सल्ला आहे की, सल्लागारांचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी जी चूक केली होती, ती करू नका," असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. "जरांगे पाटील यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, तशी चूक करू नये. जरांगे यांनीही आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये." असंही आंबेडकर यांनी सल्ला दिला.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण