शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सरकारनं अतिशय चांगला तोडगा काढला, ओबीसींवरही अन्याय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 3:44 PM

कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असं फडणवीसांनी सांगितले.

नागपूर - मराठा समाजासाठी अतिशय चांगला मार्ग निघून या आंदोलनाची सांगता झाली आहे. सरकारने या आरक्षणासाठी सकारात्मकता दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रश्न सुटलेला आहे. आम्ही सुरुवातीपासून जो काही मार्ग असेल तो कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत काढावा लागेल असं सांगत होतो. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या रक्तांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देता येईल. आज जो मार्ग निघाला तो सरकारने आणि मनोज जरांगे पाटील यांनीही स्वीकारला. यातून मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या लोकांकडे कुठल्याच नोंदी नाहीत त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. हा एक मोठा समाज आहे. त्यासाठी जे सर्वेक्षण हवं ते सुरू आहे. क्युरेटिव्ह पिटीशन यशस्वी व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. पण काही कारणात्सव त्या अपेक्षित दिलासा मिळाला नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी भरून काढण्यासाठी या सर्वेक्षणाचा वापर होणार आहे.  त्यासोबत ओबीसी समाजाच्या मनात आपल्यावर अन्याय होईल का अशी भावना होती. मात्र तोदेखील अन्याय आपण होऊ दिला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्यातून हा चांगला प्रयत्न घडला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. ज्यांच्याकडे नोंदी आणि पुरावा नाही अशांना प्रमाणपत्र दिली जात नाहीत. नोंदी मिळण्याची कार्यपद्धती सोपी करून हा मार्ग काढला आहे. त्यामुळे छगन भुजबळांचेही समाधान होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचा नाही ही आमची पहिल्यापासून भूमिका होती. त्याप्रकारे आम्ही अन्याय होऊ दिला नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अंतरवाली सराटीपासून राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या गुन्ह्यात पोलिसांवर हल्ले, घरे जाळणे, सरकारी बसेस पेटवणे यासारखे गुन्हे यांचा समावेश नाही. कारण हे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसार मागे घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे जे काही राजकीय गुन्हे आहेत ते मागे घेतले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती