मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटलेले असतानाच शिंदे सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा करून टाकली होती. याला मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांचाही विरोध होता. त्यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांचा देखील विरोध होता. याविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सदावर्तेंनी आजची अपडेट सांगितली आहे.
मराठा आरक्षणच्या संदर्भाने आज ऐतिहासिक दिवस आहे. रोज २ न्यायमूर्ती केस ऐकत असतात, परंतु आज ३ न्यायमुर्तींनी ही केस ऐकलेली आहे. राज्यसरकरच्या वकीलांनी वेळ वाढवून मागितली होती परंतु वेळ वाढवण्याच्या मागची कारणे तुटपुंजी वाटत होती, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.
मी न्यायमूर्तींना केसचे महत्व काय हे सांगितले. गोपाळ नारायण हे सुद्धा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते. आमची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणावर सुनावणीला सुरुवात केली. येत्या सोमवारपासून पुन्हा या सुनावणीला सुरुवात होणार असून ती सुरु राहणार आहे. कशाप्रकारे आमदार, खासदार मराठा समाजातून येतात हे आज आम्ही न्यायालयाला दाखवून दिले आहे. टप्प्याटप्प्यात सुनावणी सुरू राहील, असेही सदावर्ते म्हणाले.
तसेच जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री केस निकाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागला होता. आमची रणनीती अत्यंत संविधानिक असणार आहे. सरकारकडे अधिकार होते का नव्हते यापासून सुरुवात होणार आहे. अधिकारांच्या नंतर आरक्षण आहे, अधिकार प्रथम आणि नंतर आरक्षण. यामुळे यावर सोमवारी पहा काय आणि कसा युक्तीवाद होतो ते, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.