शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Maratha Reservation: "माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 5:31 AM

खासदार संभाजीराजे; मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीपूर्वी राज्यव्यापी दौरा

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर त्याचदिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

कोरोना संकटात कुटुंबीयांना गमावलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासोबतच मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आरक्षणाविषयी मत जाणून घेण्यासाठी संभाजीराजे दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोनाच्या संकटात राज्यासाठी पुढील सहा-सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण संयमाची भूमिका घेतली असून, माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आक्रमक होण्याची ही वेळ नाहीमाझ्या संयमाच्या भूमिकेविषयीही काहीजणांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, ही आक्रमक होण्याची वेळ नाही. माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. सत्ताधारी व विरोधातील नेते एक-दुसऱ्याविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यांच्याशी मराठा समाजाला काहीच घेणे-देणे नाही. आरक्षणाविषयी मार्ग काय काढणार आहात, ते सांगा, असे आ‌वाहनही त्यांनी या नेत्यांना केले. पंतप्रधानांना चारवेळा पत्र लिहूनही त्यांची वेळ मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण