नवी मुंबई - आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.मराठा आरक्षण परिषदेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय, असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. दरम्यान, मी मराठा समाजाचा नेता नाही तर सेवकमी समाजाचा नेता नाही, तर सेवक आहे' अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून समाजाच्या सोबतच बसेन, अशी भूमिका घेऊन बैठकीत सहभागी झालो आहे, असे सांगत संभाजीराजे या बैठकीत सहभागी झाले होते.
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक, राज्य सरकारला दिला गंभीर इशारा
By बाळकृष्ण परब | Published: October 07, 2020 6:27 PM
Maratha Reservation News : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय
ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक मांडली भूमिका मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नाही आहे एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल