शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे सत्र सुरूच; मराठवाड्यातील धग कायम, पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 1:31 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. विदर्भात काही ठिकाणी घंटानाद करीत झोपमोड आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीत कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, बारामती शहरातून शनिवारपासून सामाजिक एकोप्यासाठी मराठा संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे.मराठवाड्यात परळीतील आंदोलन सुरू असून आ. सतीश चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. बीड जिल्ह्यातही पडसाद उमटले. केज येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, तर भाटुंबा येथे रास्ता रोको करण्यात आला. गेवराईत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. अंबाजोगाई येथे जागरण गोंधळ करत उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.परभणी जिल्ह्यात आंदोलन सुरूच असून, सोनपेठ शहरातील शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही बसेसवर दगडफेक झाली. मानवत येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी १०१ नारळ फोडून आरक्षणाचा नवस केला. सोमठाणा ग्रुप ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला.खा. राजीव सातव यांच्या कळमनुरीतील (जि. हिंगोली) घरासमोर भजन आंदोलन केले. हिंगोलीतील गांधी चौकात पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसमोर मुंडण करून शासनाचा निषेध केला.औरंगाबाद जिल्ह्यातील आमठाणा (ता. सिल्लोड) येथे कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. पैठण शहरातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ठिय्या आंदोलन केले.पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा क्रांती मोर्चाबद्दल कथित वादग्रस्त विधान केल्याने आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्वीकारले आणि त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. कोपरगाव येथे सकल मुस्लीम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामुदायिकरित्या मुंडण आंदोलन करून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. तर मराठा-मुस्लीम-धनगर समाजाने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवित नेवासा तहसीलवर संयुक्त मोर्चाने जाऊन धडक मारली. राशीन ते कर्जत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.विदर्भातही आंदोलन जोर धरत आहे. चांदूर रेल्वे येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शनिवारी चांदूर रेल्वे बंदची हाक देण्यात आली आहे.कोल्हापुरात सरकार घराणीही रस्त्यावरमराठा आरक्षणासाठी प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध घराण्यांच्या वंशंजातील कुटुंबांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘ताराराणी चौक ते दसरा चौक’ अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत गायकवाड, पाटणकर, खानविलकर, निंबाळकर, महागावकर, जाधव, माने, घाटगे, मोहिते, घोरपडे, चव्हाण, शिंदे आदी घराण्यांतील ३०० हून अधिक सदस्यांचा समावेश होता. महिलाही अग्रभागी होत्या.सत्येंद्रसिंह मोहिते हे आपल्या घराण्याची परंपरागत तलवार घेऊन या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते; तर पैलवान कुणालाही उगीच शड्डू मारत नाही. त्यामुळे आमच्यावर सरकारने शड्डू मारण्याची वेळ आणू नये, असा इशाराही रविराज निंबाळकर यांनी दिला.रत्नागिरीत बंद आंदोलन शांततेत : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रत्नागिरीसह लांजा, राजापूर येथे बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. हातखंबा येथे मुंबई-गोवा महामार्ग अडवण्यात आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जिल्हा बंद आंदोलनात आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे आदी सहभागी झाले होते. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, मंडणगड आणि खेड तालुके या मोर्चात सहभागी झालेले नाहीत.नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. कारण या मुद्द्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजिबात इरादा नाही, असे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी स्पष्ट केले. वायदे करण्याऐवजी प्रत्यक्षात काम करणारे हे महाराष्टÑातील पहिले सरकार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्र