मुंबई : मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयातील सुनावणीत राज्य सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी. ‘डान्सबार’ आणि ‘नीट’सारखा ‘फियास्को’ करू नये, अशी सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.विखे पाटील म्हणाले की, डान्सबार सुरू होऊ देणार नाही अशी वल्गना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती. परंतु न्यायालयात योग्य भूमिका न मांडता आल्याने शेवटी अटींच्या नावाखाली डान्सबारचे परवाने जारी करण्याची वेळ आली. नीट प्रकरणामध्येही विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका केंद्र सरकारला कळावी यासाठी राज्य सरकारने पालक व विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ केंद्राकडे नेण्याची मागणी आम्ही केली होती. विरोधी पक्ष म्हणून वेळप्रसंगी आम्हीदेखील केंद्राकडे जायला तयार होतो. परंतु सरकार अतिआत्मविश्वासात गाफील राहिले. त्याचा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसला. हे पाहता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी आपली बाजू न्यायालयात लंगडी पडणार नाही, याची पुरेशी दक्षता सरकारने घ्यावी, असे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
‘मराठा आरक्षणाचा ‘डान्सबार’ होऊ नये’
By admin | Published: June 28, 2016 4:46 AM