शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवछत्रपतींसमोर शपथ घेऊन सांगतो..., दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 9:26 PM

Eknath Shinde Dasara Melava Speech: मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भाष्य़ करतात, याकडे मराठा समाजासह सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भाष्य़ करतात, याकडे मराठा समाजासह सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन, असे विधान एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगितले.

शिवसैनिकांना संबोधित करताना मराठा आरक्षणाचा विषय निघाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मीदेखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे, मला त्यांची दु:खं कळतात. वेदना कळतात. एस.टी. शिंदे समिती काम करतेय. सर्वोच्च न्यायालयाने आमची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आरक्षाच्या लढाईतील एक दरवाजा खुला झाला आहे. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता हे आरक्षण मराठा समाजाला देणार. या एकनाथ शिंदेंच्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. मी  छत्रपतींच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केलं.   

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलत असलेल्या मराठा तरुणांना भावूक आवाहन केलं. तुम्हाला सांगतो की, टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका. आपलं कुटुंब, मुलाबाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे आरक्षण आम्ही दिलं. ते हायकोर्टात टिकलं. सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. ते का टिकलं नाही, त्याला कोण जबाबदार आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्याबाबत योग्य वेळी मी बोलेन  सध्या जातीजातीत संघर्ष पेटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भीतीही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार