- नारायण जाधव / नामदेव मोरे / योगेश पिंगळे
नवी मुंबई - आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा दृढनिश्चय करून अंतरवाली सराटी (जि जालना) येवून २० जानेवारीला मुंबईकडे कूच केलेल्या लाखो मराठा समाजबांधवांनी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे धड़क देत यंत्रणेला अक्षरक्षः घाम फोडला आणि आरक्षणाचा अवघड लढा जिंकत विजयाचा गुलाल उधळूनच 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत विजयी मुद्रेने शनिवारी ते आपापल्या गावी परतण्यास निघाले. आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभूतपूर्व लक्ष्याने गर्दीचा, शिस्तीचा आणि मराठ्यांच्या एकजुटीचा नवा इतिहास समाजासमोर ठेवला.
जरांगे यांची विराट पदयात्रा शुक्रवारी पहाटे ५ वाजता वाशीत दाखल झाल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात बैठकांचे सत्र होऊन खल झाला, शनिवारी पहाटे तीन वाजता अरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सगेसोययांना कुणती दाखला देण्याची अधिसूचना दाखविली, प्रमुख मागण्या मान्य झाल्याचे सांगत मोहीम फत्ते झाल्याचे जाहीर केले. साडेनऊ वाजता शिवाजी चौकात झालेल्या ऐतिहासिक विजयी सभेत जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोसंबीचा रस घेतला आणि अवघा आसमंत छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
मराठा आरक्षणाच्या लढाईत सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यामुळे जो गुलान उचललाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका, शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, यानंतरही काही दगाफटका झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. - मनोज जरांगे, मराठा आरक्षणाचे नेते
अन्य समाज घटकावर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय होईपर्यंत त्यांना ओबीसींचे अधिकार आणि ओबीसीच्या सर्व सवलती दिल्या जातील, - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आरक्षण मिळाले नव्हे, हा केवळ मसुदा : भुजबळराज्य सरकारने मराठा आरक्षणाचाचत जारी केलेला हा अध्यादेश नसून केवळ मसुदा आहे. त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर त्याचे भवितव्य ठरेल. मात्र, अशा प्रकारची कार्यवाही झाल्यास केवळ ओबीसीच नव्हे तर दलित आणि आदिवासी समाजाचेदेखील आरक्षण धोक्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे म्हणता म्हणता ओबीसीना धक्का लावून मराठा समाजाला बैंक डोअर एंट्री दिली, कोणीही मुंबईवर मोर्चे घेऊन आले, तर त्यांना आदिवासी, दलित समाजात आरक्षण मिळू शकेल, त्यामुळे मूळ जाती-जमातीताही धोका निर्माण होईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले...
• मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ खरी करून दाखविली • दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे.• सगेसोययासह भाव-भावकीला कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार, मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचे कामही राज्य सरकार करेल,• न्या. शिंदे समितीला दोन वर्षाची मुदतवाड देण्याला मान्यता,• मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या ८० जणांच्या कुटुंबीयानी प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत देण्यात येणार
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. मराठा आरक्षणाचायत सर्वेक्षण सुरूच राहील. दरम्यानच्या काळात क्यूरेटिव्ह याचिकासुद्धा लागली आहे. त्यातच यश मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री'घरे जाळणाऱ्यांवरील गुन्हे मागे नाहीत'मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे आम्ही मागे घेतले, पण ज्यांनी घरे जाळली, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. असे गुन्हे मागे घेण्याची कुणाचीही मागणी नाही. अशा गुन्ह्याबाबत कोटांचे निर्देश आहेत, असे फडणवीस म्हणाले.
कसे मिळणार प्रमाणपत्र? अध्यादेशात नेमके काय?नवी मुंबई : सगेसोयऱ्यांनाही मराठा- कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे-पाटील यांनी केलेली मागणी राज्य सरकारने पूर्ण केली. नेमके सगेसोयरे कोण आणि कोणाकोणाला प्रमाणपत्र मिळेल, हे अध्यादेशात स्पष्ट केले आहे.सगेसोयरे म्हणजे कोण?अनुसूचित जाती. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या जातपड़ताणी नियमाचे निणुष सगेसोयत्यासाठी लागू केले आहेत. अर्जदाराचे वडील, आजोया, पणजीया य त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्नातून निर्माण झालेले नातेसंबंध, सजातीय विवाहातून तयार झालेले नातेसंबंधांचा समावेश सगेसोगद्यात असेल.सगेसोयऱ्यांचा द्यावा लागेल पुरावा कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयचाचा पुराया अर्जदाराला द्यावा लागणार आहे. सगेसोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे म्हणजे वडिलांकडील नातेवाईक असा घेतला जाईल. त्यायायत खात्री करण्यासाठी अर्जदाराच्या घरी जाऊन रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यानंतरच जातप्रमाणपत्र देण्यात येईल.